अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा कंदील मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:00 AM2017-10-06T00:00:50+5:302017-10-06T00:09:41+5:30
अंगणवाडी कर्मचाºयांना किमान दहा हजार रुपये व सेवाज्येष्ठतेनुसार मानधन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने तालुकाध्यक्ष कल्पना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयावर कंदील मोर्चा नेण्यात आला.
मालेगाव : अंगणवाडी कर्मचाºयांना किमान दहा हजार रुपये व सेवाज्येष्ठतेनुसार मानधन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने तालुकाध्यक्ष कल्पना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयावर कंदील मोर्चा नेण्यात आला.
रावळगाव नाका येथून अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या मोर्चास प्रारंभ झाला. बालविकास प्रकल्प कार्यालयमार्गे प्रांताधिकारी तथा प्रभारी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या कार्यालयावर मोर्चा येऊन धडकला. परंतु मोर्चेकºयांचे निवेदन स्वीकारण्यास कुणीही कर्मचारी न आल्याने संतप्त अंगणवाडी सेविकांनी मोसमपूलमार्गे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा नेला. निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचाºयांना किमान दहा हजार रुपये मानधन मिळावे, सेवाज्येष्ठतेनुसार मानधन मिळावे, लाभार्थींच्या आहाराच्या रकमेमध्ये तिपटीने वाढ करावी, टीएचआर बंद करून लाभार्थींना पर्यायी आहार द्यावा, जून ते आॅगस्ट महिन्याच्या मानधनाची रक्कम मिळावी. फेब्रुवारीपासून थकीत असलेली लाभार्थींची आहाराची रक्कम मिळावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. भुसे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. दिवाळीपर्यंत तुम्हाला भाऊबीज मिळेल, असे आश्वासन दिले. मोर्चात कल्पना पाटील, रत्नप्रभा टेंभरे, शोभा निकम, नलिनी कचवे, अरुणा बावा, शुभा शमिम, कमल परुळेकर, बीटप्रमुख विजया बेडसे यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी महिला सहभागी झाल्या होत्या. शिवसेना संपर्क कार्यालयात प्रमोद शुक्ला, विनोद वाघ, तालुकाप्रमुख संजय दुसाने आदी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.