नाशिकमध्ये व्हावे कानेटकरांचे स्मारक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:14 AM2021-03-21T04:14:22+5:302021-03-21T04:14:22+5:30

नाशिक : मराठी रंगभूमीला तीन दशकांहून अधिक काळ नवीन ऊर्जा देण्याचे काम कानेटकरांच्या नाटकाने केले. ते मराठी ...

Kanetkar's memorial should be in Nashik! | नाशिकमध्ये व्हावे कानेटकरांचे स्मारक !

नाशिकमध्ये व्हावे कानेटकरांचे स्मारक !

googlenewsNext

नाशिक : मराठी रंगभूमीला तीन दशकांहून अधिक काळ नवीन ऊर्जा देण्याचे काम कानेटकरांच्या नाटकाने केले. ते मराठी नाटकांच्या इतिहासातील सर्वेात्तम नाटककार होते, अशा शब्दात अभिनेते सदानंद जोशी यांनी सार्वजनिक वाचनालयात झालेल्या नाटककार वसंत कानेटकर यांना अभिवादन कार्यक्रमात व्यक्त केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी नाशिकमध्ये कानेटकरांचे स्मारक उभे रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाटककार विवेक गरुड, नागेश कांबळे, लक्ष्मण बाणाईत, मुकुंद कुलकर्णी, मुक्तेश्वर मुन्नशेट्टीवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते हे होते. कानेटकरांच्या विविध आठवणींना जयप्रकाश जातेगावकर, मुकुंद कुलकर्णी, विवेक गरुड, वसंत खैरनार, नागेश कांबळे यांनी उजाळा दिला. नाशिक शहरात कानेटकरांचे यथायोग्य स्मारक उभे राहावे आणि त्यांच्या साहित्याचे जतन संवर्धन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून कानेटकरांच्या आठवणींचा जागर करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालभवन प्रमुख संजय करंजकर यांनी केले. कार्याध्यक्ष वसंत खैरनार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी केले. कार्यक्रमास वाचनालयाचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, सहा. सचिव ॲड. भानुदास शौचे, श्रीकांत बेणी यांच्यासह सुभाष पाटील, कृष्णा पवार, अनंत बाणाईत, वाचक सभासद व सेवकवृंद उपस्थित होते.

फोटो

२०सावाना कानेटकर

Web Title: Kanetkar's memorial should be in Nashik!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.