कन्याकुमारी-काश्मीर पदयात्रेकरू पी. एन. भारतचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:14 AM2021-02-10T04:14:28+5:302021-02-10T04:14:28+5:30
कोरोनाच्या महामारीत अनेकांचे बळी गेले तर अनेक जण हैराण झालेत. काळजी घेण्यापलीकडे आपल्या हातात काही नसून खरा मानवतेचा संदेश ...
कोरोनाच्या महामारीत अनेकांचे बळी गेले तर अनेक जण हैराण झालेत. काळजी घेण्यापलीकडे आपल्या हातात काही नसून खरा मानवतेचा संदेश देण्यासाठी भारत पीएन हे म्हैसूरचा व्यावसायिक स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन निघाले आहेत. वाटेत मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण करून निसर्गही वाचला पाहिजे हा संदेश देत ते पुढील प्रवास सुरू करतात. दररोज ३० किलोमीटरचा प्रवास करत आतापर्यंत दोनशे गावांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत.
वावीत आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. येथील साई भक्त निवासमध्ये मुक्काम करून पुढील प्रवासासाठी भारत पीएन रवाना झाले. यावेळी महेश पतसंस्थेचे अध्यक्ष विजय सोमाणी, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विलास पठाडे, आशीष माळवे, संदीप राजेभोसले, भरत आनप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोट...
‘मानवता धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. कारण कोरोनासारख्या महामारीच्या काळात पैसा कामाला नसून मानवता धर्म हाच कामी आला. हाच संदेश मी देत पदयात्रा करीत आहे.
- भारत पीएन, यात्रेकरू, म्हैसूर