कपालेश्वर पंचमुखी महादेव पालखी सोहळ्याला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 01:32 AM2019-08-19T01:32:30+5:302019-08-19T01:32:48+5:30
श्रावण महिना आला की सर्वत्र भक्तिमय वातावरण बघायला मिळते. त्यात श्रावणी सोमवारी शिव भक्तांचा उत्साह शिगेला पोहचलेला बघायला मिळतो. त्यामुळे तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने कपालेश्ववर मंदिरातून काढण्यात येणाºया पालखी सोहळयाची तयारी पूर्ण झाली आहे.
नाशिक : श्रावण महिना आला की सर्वत्र भक्तिमय वातावरण बघायला मिळते. त्यात श्रावणी सोमवारी शिव भक्तांचा उत्साह शिगेला पोहचलेला बघायला मिळतो. त्यामुळे तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने कपालेश्ववर मंदिरातून काढण्यात येणाºया पालखी सोहळयाची तयारी पूर्ण झाली आहे.
दुसरीकडे शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. प्रथेनुसार पालखी दुपारी अडीच वाजता पंचमुखी कपालेश्वर मंदिरात आणण्यात येणार असून, दुपारी ४ वाजेच्या सुमारास कपालेश्वर मंदिरातून या सोहळ्याला सुरु वात होणार आहे, तर संध्याकाळी ७ वाजता रामकुंडावर महापूजा केली जाणार आहे.
वंश परंपरेप्रमाणे वैद्य कुटुंबीयाकडे सदर पालखीचा मान आहे. अरविंद वैद्य, जगदीश वैद्य, सुहास वैद्य आणि मनोज वैद्य या पालखी सोहळ्याची परंपरा जोपासत आहेत. सुरुवातीला सोमवारी सकाळी अरविंद वैद्य पंचमुखी महादेवाची पूजा करतील. त्यानंतर दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पंचमुखी कपालेश्वर मंदिरात आणण्यात येईल. कपालेश्ववर मंदिरात विधीवत पूजा आणि शृंगार करून सवाद्य पालखी सोहळ्याला सुरु वात होईल.
रामकुंडावर दूध, दही, मध, उसाचा रस याचा अभिषेक करण्यात येतो. महाआरती झाल्यानंतर पंचमुखी कपालेश्ववर मंदिरात नेली जाते.
कपालेश्वर मंदिरातून सदरची पालखी सुरुवात करून मालवीय चौक, शनी चौक, राममंदिर पूर्व दरवाजा, सरदार चौक, मुठे गल्ली व पुन्हा शनी चौकातून रामकुंडावर साडेसहाच्या
दरम्यान आणली जाते. यावेळी पालखी सोहळ्याच्या मार्गावर भक्तगण मोठ्या उत्साहाने रांगोळी काढून पालखी स्वागत करणार आहेत.