कर्जमाफीच्या दहा हजारासाठी जिल्हा बॅँकेची ‘वणवण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 05:13 PM2017-07-26T17:13:58+5:302017-07-26T17:15:10+5:30
लोेकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्य सरकारने शेतकºयांना जाहीर केलेली कर्जमाफीची कारवाई सुरू असतानाच, खरिपासाठी आवश्यक बी-बियाणे व खते खरेदीसाठी दहा हजारांची मदत जाहीर केली आहे. आता खरीप हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले तरी शेतकºयांना तातडीची दहा हजारांची मदत देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने राज्य शिखर बॅँकेकडे केलेल्या ९० कोटींच्या प्रस्तावाला अद्याप उत्तर मिळालेले नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉँगे्रसच्या एका पदाधिकाºयाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडून अडकलेल्या पैशापोटी तातडीची मदत म्हणून ५० हजाराची रक्कम दुसºया बॅँकेत आरटीजीएसद्वारे देत असल्याची अफवा पसरविल्याने जिल्हा बॅँकेत दोन दिवसांपासून गर्दी झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांनी यासंदर्भात परिपत्रक काढून सोशल मीडियावर व्हॉट्स अॅपद्वारे केलेला जिल्हा बॅँकेबाबतचा प्रचार खोडसाळपणाचा असल्याचे स्पष्ट केले आहे. जसे पैसे उपलब्ध होतील तसे ते ग्राहकांना दिले जातील, असे म्हटले आहे.
जिल्ह्यातील एकूण सुमारे अडीच लाख शेतकºयांकडे कृषी कर्ज असून, त्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडील कर्जमाफीस पात्र ठरू शकणारे जवळपास ९० हजार शेतकरी सभासद आहेत. जिल्हा बॅँकेने सरकारने जाहीर केलेल्या तातडीच्या दहा हजाराच्या अनुदानासाठी पात्र ठरू शकणाºया सुमारे ९० हजार शेतकरी सभासदांना खरीप हंगामात बी-बियाणे यांची मदत करण्यासाठी सुमारे ९० कोटींचे अनुदान देण्याचा प्रस्ताव राज्य शिखर बॅँकेकडे पाठविला आहे. मात्र तो प्रस्ताव पाठवून आता काही दिवस उलटले तरी राज्य शिखर बॅँकेकडून अद्याप जिल्हा बॅँकेला एक रुपयाही प्राप्त झालेला नाही. दुसरीकडे जिल्हा बॅँकेकडे शेतकºयांना त्यांच्या ठेवी देण्यासाठीच पैसे नसल्याने ही तातडीची दहा हजाराची मदत द्यावी तरी कुठून, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.