आशा फिल्म फेस्टिव्हलमध्ये करंजीकर, फिरके यांना जीवनगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:15 AM2019-09-19T00:15:53+5:302019-09-19T00:16:44+5:30
आशा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ रंगकर्मी राजू फिरके आणि विद्या करंजीकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याआधी सकाळी निघालेल्या रॅलीनंतर झालेल्या सोहळ्यात विविध देशांमधून आलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमवेत चित्रपटांच्या तांत्रिक बाबींवर चर्चासत्र पार पडले.
नाशिक : आशा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ रंगकर्मी राजू फिरके आणि विद्या करंजीकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याआधी सकाळी निघालेल्या रॅलीनंतर झालेल्या सोहळ्यात विविध देशांमधून आलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमवेत चित्रपटांच्या तांत्रिक बाबींवर चर्चासत्र पार पडले.
गंगापूररोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आशा फाउंडेशनतर्फे झालेल्या या सोहळ्यात देशोदेशीच्या दर्जेदार चित्रपट, लघुफिल्मचे सादरीकरण करण्यात आले. बुधवारी सकाळी झालेल्या रॅलीमध्ये चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
युवा चित्रपटप्रेमी शुभम वाघ, पीयूष बागुल, श्लोक पाटील, जेम्स इमॅन्युएल व संदीप युनिव्हर्सिटीतील एमबीएच्या विद्यार्थ्यांनी आयोजनात मोलाचे योगदान दिले. फेस्टिव्हलला चित्रपटप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला.
या फेस्टिव्हलमध्ये तुर्कीचे टोल्गा ओकूर, दक्षिण कोरियाचे किम यून सिक, कॅनडाचे अफरोझ खान, पोर्तुगीजचे कार्लोस सिएलो कोस्टा, अमेरिकेचे डेव्हिड आणि रशियाचे लॅडा लकी हे दिग्दर्शकदेखील सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या चर्चासत्रात या विदेशातील चित्रपट दिग्दर्शकांसह आशा संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, दीपक शिवदे आणि राजेश भालेराव यांनी चित्रपट निर्मिती आणि वितरणासह तांत्रिक बाबींवर चर्चा केली.