करंजखेड गाव झाले चकाचक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 07:23 PM2020-09-03T19:23:10+5:302020-09-04T00:41:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : गावात प्रवेश केल्याबरोबर दिसणारे स्वच्छ आणि चकाचक रस्ते, गल्लीबोळात रेखाटलेले रंगीत पट्टे, सार्वजनिक पाणवठा व चौकाचौकातील गवताचे निर्मूलन यामुळे पेठ तालुक्यातील करंजखेड गावाचे रूप पालटले आहे.

Karanjkhed village became brilliant! | करंजखेड गाव झाले चकाचक !

करंजखेड, ता. पेठ येथे स्वच्छता अभियान नंतर चकाचक दिसत असलेले रस्ते.

Next
ठळक मुद्देजनसेवा मंडळाचा उपक्रम : ग्रामसफाईने पालटले रूप

लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : गावात प्रवेश केल्याबरोबर दिसणारे स्वच्छ आणि चकाचक रस्ते, गल्लीबोळात रेखाटलेले रंगीत पट्टे, सार्वजनिक पाणवठा व चौकाचौकातील गवताचे निर्मूलन यामुळे पेठ तालुक्यातील करंजखेड गावाचे रूप पालटले आहे.
पेठ सुरगाणा तालुका जनसेवा मंडळाच्या वतीने ग्रामसफाई व स्वच्छता अभियानासमवेत ग्राम सुशोभिकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून, यामध्ये ग्रामस्थांच्या सहभागातून गावोगावी स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. करंजखेड या अतिदुर्गम गावापासून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. दररोज सकाळी गावातील ग्रामस्थ व जनसेवा मंडळाचे सदस्य हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करतात. रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात आले असून, त्यांनाही पट्टे मारण्यात आल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. टप्प्याटप्प्याने ही मोहीम पेठ व सुरगाणा तालुक्यातील गावागावात राबवण्यात येणार असल्याचे जनसेवक कमलेश वाघमारे यांनी सांगितले. याप्रसंगी हनुमंत वाघमारे, कमलेश वाघमारे, मनोहर जाधव, दिलीप महाले, रोहित राऊत, रघुनाथ घोरपडे, कमलाकर गवे, सीताराम घोरपडे, धनाजी लहरे, भाऊराव गवे, पंडित गवे, राहुल शेवरे, कैलास गवे, पंढरीनाथ भडांगे, परसराम मुकणे, विष्णू पवार, जयश्री भडांगे, रोहिणी घोरपडे यांच्यासह करंजखेडचे ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Web Title: Karanjkhed village became brilliant!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.