कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा निकाल ९४.६२ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 04:22 PM2020-07-29T16:22:40+5:302020-07-29T16:25:29+5:30
साकोरा : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा साकोरे शाखेतील एस. एस. सी. परीक्षेचा ९४.६२ टक्के निकाल लागला असून, मुलींनीच निकालाची उत्तुंग भरारी मारली आहे.
साकोरा : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा साकोरे शाखेतील एस. एस. सी. परीक्षेचा ९४.६२ टक्के निकाल लागला असून, मुलींनीच निकालाची उत्तुंग भरारी मारली आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय साकोरे शाखेचे चालू वर्षी सेमी माध्यमातील ५८ विद्यार्थ्यांपैकी ५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या तुकडीचा निकाल ८८.५७ टक्के लागला आहे.
यामध्ये अनुक्र मे -
प्रथम - सुरसे गायत्री दिगंबर ९२.८० टक्के, द्वितीय - निकम अंजली विश्वनाथ ९१.६० टक्के, तृतीय - सुरसे गायत्री रविंद्र ९१ टक्के गुण मिळवून मुली यशस्वी झाल्या आहेत. तसेच मराठी माध्यमातील ३५ विद्यार्थ्यांपैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मराठी माध्यमाच्या तुकडीचा निकाल ८८.५७ टक्के लागला.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्र मांकाने सुरसे सोनल जयवंत- ८०.८० टक्के, द्वितीय क्र मांक - भुसारे पूजा ज्ञानेश्वर- ७९.८० टक्के, तसेच तृतीय क्र मांक - गावीत माधुरी सुभाष- ७७.६० टक्के गुण मिळवून मुलींनीच बाजी मारली आहे. ९० टक्केपेक्षा जास्त - ६ विद्यार्थी, तसेच विशेष प्राविण्य - ४७ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. (तीन फोटो तारीख व नावाने )