क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:42 AM2017-07-31T00:42:55+5:302017-07-31T00:43:00+5:30
शालेय विद्यार्थी वाहतूक करणाºया रिक्षा, व्हॅन तसेच अन्य खासगी वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचे निदर्शनास आले आहे.
पंचवटी : शालेय विद्यार्थी वाहतूक करणाºया रिक्षा, व्हॅन तसेच अन्य खासगी वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील शेकडो विद्यार्थी खासगी रिक्षा तसेच व्हॅनमधून प्रवास करतात. व्हॅन तसेच रिक्षात मोजके विद्यार्थी बसवून वाहतूक करणे गरजेचे असले तरी काही विद्यार्थी वाहतूक करणाºया चालकांकडून रिक्षा व व्हॅनमध्ये विद्यार्थी कोंबून बसविले जातात. व्हॅनमध्ये २५ ते ३० व रिक्षात ९ ते १० शाळकरी विद्यार्थी बसवून वाहतूक केली जात आहे. वाहनात मोजक्याच विद्यार्थ्यांची वाहतूक केली तर परवडत नाही असे चालकांकडून सांगितले जाते; मात्र नियमांची पायमल्ली करून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करून त्यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम वाहनचालक करत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.