कसारा घाट आज पासून दुरुस्तीसाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:36 IST2025-02-24T14:36:26+5:302025-02-24T14:36:35+5:30
Mumbai Nashik Highway Traffic Update: कसारा घाट बंद असल्याने अवजड वाहने मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मार्गे वळविण्यात आली आहेत.

कसारा घाट आज पासून दुरुस्तीसाठी बंद
शाम धुमाळ
मुंबई नाशिकमहामार्गावरील कसारा घाट दोन टप्प्यात बंद राहणार असूनआज पासून २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद करण्यात आला आहे. तर ३ ते ६ मार्च पर्यंतही याच वेळेत राहणार बंद पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी घाट बंद असणार असून या कालावधीत नाशिक मुंबई महामार्गावरून नवीन कसारा घाटातून वाहतूक वळविली आहे. दरम्यान या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली असून ओडिसी सारखी अवजड वाहने मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मार्गे वळविण्यात आली आहेत.
आज सकाळी दहा वाजे पासून रस्ते दुरुस्ती ला सुरुवात झाली असून प्रवाशा च्या व वाहुतुकदाराच्या सुरक्षेसाठी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित,महामार्ग पोलीस केंद्र चे अधिकारी छाया कांबळे,राम होंडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून आपत्कालीन घटनेसाठी मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य मदतीला कार्यरत आहेत.
दरम्यान या ट्राफिक ब्लॉक मुळे जव्हार मोखाडा या दिशेने येणारी वाहतूक घाटणदेवी मंदिर मार्गे नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. तर नाशिक कडे जाताना नवीन घाटातून वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवत प्रवास करावा तसेच कोणीही ओव्हरटेक करू नये असे आवाहन पोलिसांनी केले असून कसारा पोलीस व महामार्ग पोलीस गस्त करीत आहेत.