ट्रेलर बंद पडल्याने कसारा घाट ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:16 AM2019-06-12T01:16:34+5:302019-06-12T01:17:14+5:30

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या रस्त्यावर जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ एक ट्रेलर व ट्रक एकाच वेळी नादुरुस्त झाल्याने सुमारे २ तास वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, वाहतूक पोलीस वेळेवर न आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

Kasara Ghat jap due to the closure of the trailer | ट्रेलर बंद पडल्याने कसारा घाट ठप्प

कसारा घाटात महाकाय ट्रेलर व ट्रक बंद पडल्यामुळे वाहनांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा.

googlenewsNext

इगतपुरी : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या रस्त्यावर जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ एक ट्रेलर व ट्रक एकाच वेळी नादुरुस्त झाल्याने सुमारे २ तास वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, वाहतूक पोलीस वेळेवर न आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
मंगळवारी (दि.११) सकाळी १२ वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणारा महाकाय ट्रेलर
(क्र. आरजे ०१ जीए ९०१८) कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ आला असता अचानक बंद पडला. त्यामागून येणारा अवजड ट्रक (क्र. एमएच ०६ एक्यू ३७३१) हादेखील या ट्रेलरला ओव्हरटेक करताना ट्रेलरच्या बाजूलाच बंद पडला. त्यामुळे मागून येणारी वाहतूक पूर्णपणे थांबली. सर्वप्रथम एक्स्प्रेसवेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र वाहतूक पोलिसांना येण्यास उशीर झाला.
त्यानंतर एक्स्प्रेसवेचे कर्मचारी, पोलीस व प्रवाशांनी मिळून कंटेनरच्या साह्यााने, ओव्हरलोड ट्रकला हाताने धक्का देत तब्बल २ तासानंतर वाहतूक सुरळीत केली. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. यामुळे प्रवाशांनी वाहतूक पोलिसांवर संताप व्यक्त केला.
क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणारे ट्रक बिनदिक्कतपणे दिवसभर कसारा घाटात वाहतूक करतात. याला वाहतूक पोलिसांचा आशीर्वाद असल्याने नेहमी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. वाहतूक कोंडी झाल्यावरदेखील पोलीस वेळेवर न पोहोचल्याने प्रवाशांमध्ये संताप आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाºया ट्रकवर कारवाई अपेक्षित असताना ती होताना दिसून येत नाही.

Web Title: Kasara Ghat jap due to the closure of the trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.