कसबे सुकेणेत ‘आप’ चा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 03:07 PM2018-03-23T15:07:56+5:302018-03-23T15:07:56+5:30
कसबे सुकेणे :- निफाड तालुका आम आदमी पार्टीच्यावतीने आज कसबे सुकेणे येथे स्थानिक प्रश्नांकरिता मोर्चा काढण्यात आला.
कसबे सुकेणे :- निफाड तालुका आम आदमी पार्टीच्यावतीने आज कसबे सुकेणे येथे स्थानिक प्रश्नांकरिता मोर्चा काढण्यात आला. रहिवास अतिक्र मण कायम करणे , कोकणगाव-सुकेणे-चांदोरी रास्ता नूतनीकरण आणि कसबे सुकेणे शहरात सुरु असलेले अवैद्य दारू विक्र ी बंद करण्याची मागणी मोर्चेकरांनी केली. कसबे सुकेणे येथे आज शुक्र वारी निफाड तालुका आम आदमी पार्टी आणि कसबे सुकेणे शाखेच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. कसबे सुकेणे येथील दाऊदवली शाह बाबा यांच्या दर्ग्यासमोरील रहिवासी अतिक्र मण राज्य सरकारच्या नवीन अद्यादेशानुसार कायम करणे, दिंडोरी-निफाड-सिन्नर या दोन तालुक्यांना जोडणारा कोकणगाव-सुकेणे-चांदोरी रास्ता नूतनीकरण करणे व कसबे सुकेणे शहरात सुरु असलेली अवैद्य दारू आणि जुगार धंदे बंद करणे या मागणीसाठी आपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चा करीत ग्रामपालिका , पोलीस ठाणे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच कोकणगाव रस्त्याच्या दुर्दशेकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हा प्रमुख अॅड. प्रभाकर वायचाळे , निरीक्षक सुभाष तंवर , अनिल कौशिक, उत्तम निरभवने , सुरेश देवकर, अल्ताफ शेख , ज्ञानदेव वैद्य , संतोष पगारे, सागर खडताळे यांनी मोर्चेकरांना मार्गदर्शन करून कसबे सुकेणे येथील रहिवास अतिक्र मण कसबे सुकेणे येथील कायम न झाल्यास मुंबईत नाशिक मध्ये आंदोलन छेडू असा इशारा दिला. या प्रसंगी भारत पवार, निवृत्ती पवार, दोधू जोशी , संजय गांगुर्डे, संजय धुमाळ आदींसह शेकडो आपचे कार्यकर्ते व महिला पुरु ष उपस्थित होते. कसबे सुकेणे व ओझर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.