कसबे सुकेणेला प्रशासन उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 07:03 PM2021-03-31T19:03:59+5:302021-03-31T19:04:33+5:30

कसबे सुकेणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रशासनाने रस्त्यावर उतरुन धडक कारवाई व जनजागृती केली व उपाययोजनेची पाहणी केली.

Kasbe Sukenela administration took to the streets | कसबे सुकेणेला प्रशासन उतरले रस्त्यावर

कसबे सुकेणेला प्रशासन उतरले रस्त्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देमास्क, सोशल डिस्टन्सचे पालन करावे. अन्यथा कारवाई

कसबे सुकेणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रशासनाने रस्त्यावर उतरुन धडक कारवाई व जनजागृती केली व उपाययोजनेची पाहणी केली.

ओझर व कसबे सुकेणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.
नाशिक ग्रामीण विभागाचे उपअधीक्षक अर्जुन भोसले, तहसीलदार शरद घोरपडे, मंडल अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख, पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांनी कसबे सुकेणे व ओझरकरांना शासकीय नियमानुसार कडक अंमलबजावणी करण्यात यावी तसेच मास्क, सोशल डिस्टन्सचे पालन करावे. अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आवाहन केले.

यावेळी उपसरपंच धनंजय भंडारे यांनी कोरानाविषयक गावातील उपाययोजना व खबरदारीची माहिती दिली. स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

Web Title: Kasbe Sukenela administration took to the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.