कसबे सुकेणेला साजरा झाला वेशीच्या पोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:19 AM2021-09-07T04:19:15+5:302021-09-07T04:19:15+5:30
बैलांची संख्या झाली कमी कसबे सुकेणे : येथील पारंपरिक शेकडो वर्षांपासूनचा वेशीचा पोळा सोमवारी (दि.६) शेवकर बंधूंची मानाची ...
बैलांची संख्या झाली कमी
कसबे सुकेणे : येथील पारंपरिक शेकडो वर्षांपासूनचा वेशीचा पोळा सोमवारी (दि.६) शेवकर बंधूंची मानाची बैलजोडी सोडून पोळा फोडला व वेस खुली करण्यात आली.
गतवर्षी इतिहासात प्रथमच पोळा वेस न उघडता गावाने पोळा सण साजरा केला होता, यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने कोरोनाविषयक शासकीय नियम पाळून हा सण साजरा करण्यात आला.
सकाळी शेवकर बंधूंनी कसबे सुकेणेच्या मुख्य वेसीचे पूजन करत तोरण बांधले, त्यानंतर सायंकाळी सहा वाजता सुदाम लक्ष्मण शेवकर व सदाशिव त्र्यंबक शेवकर यांच्या मानाच्या बैलजोडीचे पूजन करण्यात आले. प्रथम बैलजोडी सोडून पोळा फोडण्यात आला. यावेळी मानकरी शेवकर बंधू व ग्रामस्थ आणि पोलीस उपस्थित होते.
मौजे सुकेणेत प्रथमच मिरवणूक
मौजे सुकेणे येथेही आज विषमुक्त नैसर्गिक शेती प्रयोग परिवार व ग्रामस्थ यांच्या वतीने यंदा प्रथमच सजविलेल्या बैलजोड्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बैलजोड्यांचे व शेती आणि शेतकऱ्यांचे महत्त्व यावर जनजागृतीपर फलक या मिरवणुकीत शेतकरी व विद्यार्थ्यांनी घेत लक्ष वेधून घेतले होते. मिरवणुकीचा शुभारंभ आपचे नेते जितेंद्र भावे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र मोगल, महंत सुकेणेकर बाबा, अरुण मोगल, सर्जेराव मोगल, प्रताप मोगल, प्रकाश मोगल, श्याम मोगल आदींच्या हस्ते झाला. संबळच्या तालावर कोरोनाविषयक शासकीय नियम पालन करत ही मिरवणूक पार पडली. (०६ सुकेणे,१,२)
yogesh sagar