काशी एक्स्प्रेसचा थांबा नवीन वेळापत्रकातून गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 09:20 PM2020-11-09T21:20:39+5:302020-11-10T01:37:03+5:30
नांदगांव : रेल्वेच्या नवीन थांब्याची मागणी प्रतीक्षेत असताना, कायम थांबा असलेल्या काशी एक्स्प्रेसचा थांबा रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात नसल्याने नांदगावकरांवर अन्याय होत असल्याची तक्रार खासदार भारती पवार यस्च्याचेकडे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
नांदगांव : रेल्वेच्या नवीन थांब्याची मागणी प्रतीक्षेत असताना, कायम थांबा असलेल्या काशी एक्स्प्रेसचा थांबा रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात नसल्याने नांदगावकरांवर अन्याय होत असल्याची तक्रार खासदार भारती पवार यस्च्याचेकडे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
काशी एक्स्प्रेसचा दर्जा कोविड-१९ यात्रा स्पेशल ट्रेन असा करण्यात आलेला असला तरी नांदगाव रेल्वेस्थानकावर तिला थांबा न देणे ही बाब नांदगावला सातत्याने रेल्वे प्रशासनाकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचा नमुना असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या तीन-चार वर्षांच्या कालावधीत महानगरी असो की पुणे-भुसावळ एक्स्प्रेस मोठ्या आंदोलनानंतर महानगरीचा थांबा देण्यात आला. त्यासाठी नांदगावकरांना संघर्ष करावा लागला.
कोरोना काळातदेखील दुटप्पी भूमिका रेल्वे प्रशासन वरिष्ठ पातळीवरून घेत आहे. नांदगाव स्थानकावर नियमित जेमतेम १० रेल्वे प्रवासी गाडीचा थांबा आहे. कोविडमुळे ०६ रेल्वे प्रवासी गाड्या सुरू आहेत व ४ बंद आहेत सुरू असलेल्यांपैकी ०५ गाड्यांना थांबा आहे. काशी एक्सप्रेस सण/उत्सवात स्पेशल गाडी म्हणून चालवली तरी काशी एक्सप्रेसला नांदगावला थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार भारती पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सुमित सोनवणे, तुषार पांडे, दत्तराज छाजेड आदी उपस्थित होते.
थांबा देण्याची मागणी
काशी एक्स्प्रेस मात्र थांब्यातून वगळण्यात आले. कोविड काळात ज्या गाड्या सद्य: स्थितीला थांबत आहेत. त्यात डाऊन जनता एक्स्प्रेस पहाटे ३:३० वाजता, महानगरी ४:४५ वाजता, मुंबईकडून महाराष्ट्र पुणेकडून सकाळी ६:१० नंतर कामायनी सांयकाळी ५:३० वाजता तसेच अपला महानगरी एक्स्प्रेस सकाळी ८:४५ वाजता व सायंकाळी कामायनी ५:३० वाजता या वेळापत्रकानुसार अपलाइनला ९ तास व डाउन लाइन १२ तास मुंबईहून नांदगावसाठी एकही गाडी नाही. काशी एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी होत आहे.