नृत्यानुष्ठानात कथक नृत्याविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:33 AM2018-07-09T01:33:57+5:302018-07-09T01:34:26+5:30
नाशिक : गुरू वास्वती मिश्रा यांच्या शिष्या संगीता चटर्जी यांनी राग बागेश्रीमध्ये सादर केलेल्या कबीरदासजींच्या- मंत्रमुलं गुरू, ध्यान मुलं गुरूमूर्ति या दोह्यांवरील कथक नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली.
नृत्यानुष्ठानच्या अकराव्या पुष्पात कबीरदास यांच्या दोह्यांवर कथक नृत्याविष्कार सादर करताना संगीता चटर्जी.
नाशिक : गुरू वास्वती मिश्रा यांच्या शिष्या संगीता चटर्जी यांनी राग बागेश्रीमध्ये सादर केलेल्या कबीरदासजींच्या- मंत्रमुलं गुरू, ध्यान मुलं गुरूमूर्ति या दोह्यांवरील कथक नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात कीर्ती कलामंदिरतर्फे रविवारी (दि.८) नृत्यानुष्ठानचे ११ वे पुष्प तस्मै श्री गुरवे नम: या संकल्पनेच्या नूपुर झंकारातून साकारण्यात आले. संगीता चटर्जी यांनी ताल वसंतमध्ये परंपरेनुसार थाट, आमद, तोडे, तिहाई, तत्कार आदी कलाविष्कारांचे सादरीकरण झाले. अभिनय पक्षात राग मधुवंती व सुगंधमध्ये गुरू बिन कौन बतावे बाट हे भजन प्रस्तुत केले. त्यांना तबला- झाकीर हुसेन वारसी, गायन व संवादिनी - शुहेब हसन यांनी साथसंगत केली.
द्वितीय सत्रात मनीषा साठे यांची शिष्य मंजिरी कारु ळकर यांनी ब्रह्मानंदम् परम सुखदं, या गुरु वंदनेने कलाविष्काराने सुरुवात केली. त्यानंतर ताल पक्षात ७ मात्रांचा ताल रूपक पेश करताना गुरूंकडून शिकलेल्या बंदिशींना त्यांनी स्वत:च्या विचारातून दिलेला नवा नृत्याविष्कार सादर केला.
दरम्यान, कीर्ती कलामंदिरच्या अदिती पानसे आणि रेखाताई नाडगौडा यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. रेणुका येवलेकर यांच्या निवेदनाने कार्यक्र मात रंगत भरली. प्रारंभी रवि रहाणे आणि बाळकृष्ण तिडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. कार्यक्रमास रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.