कथक नृत्याविष्काराने जिंकली मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:49 AM2019-05-26T00:49:26+5:302019-05-26T00:49:42+5:30

ख्यातनाम तबलावादक मयंक बेडेकर यांनी सादर केलेले ताल त्रितालातील पेशकार, कायदे, रेले, चलन, गत-तुकडे आदी तबलाविष्कार आणि ज्येष्ठ नृत्यांगणा कीर्ती भवाळकर यांच्या त्रितालातील थाट, आमद आदी शैलीतील कथक नृत्याविष्कारांनी नाशिककर रसिकांची मने जिंकली.

 Kathak won the dance award | कथक नृत्याविष्काराने जिंकली मने

कथक नृत्याविष्काराने जिंकली मने

Next

नाशिक : ख्यातनाम तबलावादक मयंक बेडेकर यांनी सादर केलेले ताल त्रितालातील पेशकार, कायदे, रेले, चलन, गत-तुकडे आदी तबलाविष्कार आणि ज्येष्ठ नृत्यांगणा कीर्ती भवाळकर यांच्या त्रितालातील थाट, आमद आदी शैलीतील कथक नृत्याविष्कारांनी नाशिककर रसिकांची मने जिंकली. निमित्त होते पवार तबला अकादमीच्या सुवर्ण महोत्सवीवर्षानिमित्त आयोजित ‘तालाभिषेक २०१९’ संगीतकला महोत्सवाचे.
पवार तबला अकादमी व एसडब्लूएस फायनान्सियल सोलुशनतर्फे रावसाहेब थोरात सभागृहात शनिवारी (दि.२५)‘तालाभिषेक-२०१९’च्या दुसऱ्या पुष्पाच्या दुसºया दिवशी तबलावादनासोबतच कथक नृत्याविष्क रांची मेजवानी नाशिककरांना अनुभवायला मिळाली. प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी हॉटेल व्यावसायिक विक्रम उगले, निर्मला सावल, मुंबईचे ख्यातनाम तबलावादक पंडित राजेंद्र अंतरकर आदी उपस्थित होते. सुरुवातीला तबलावादन वैष्णवी भडकमकर यांनी ताल त्रितालात उठाण , पेशकार कायदा, रेला, चक्रदार आदी विविध प्रकार सादर करून रसिकांची दाद मिळविली. त्यानंतर ज्येष्ठ नृत्यांगणा कीर्ती भवाळकर यांनी गणेश व सरस्वती वंदना, ताल पक्ष, ताल त्रितालात प्रथेनुसार थाट, आमद, तोडे, तुकडे, चक्रदार, गिनती तिहाई, लडी, तत्कार सादर करून रसिकांची मने जिंकली. प्रास्ताविक रघुवीर अधिकारी यांनी प्रास्ताविक केले, तर सुनेत्रा मांडवगणे-महाजन यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Web Title:  Kathak won the dance award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.