कातकाडे शिवसेनेचे तर गडाख भाजपाचे गटनेते
By Admin | Published: March 10, 2017 12:57 AM2017-03-10T00:57:32+5:302017-03-10T00:57:47+5:30
सिन्नर : गेल्या आठवड्यात पंचायत समितीसाठी मतदान झाल्यानंतर नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांची शिवसेना व भाजपा यांनी स्वतंत्ररीत्या गटनोंदणी केली आहे.
सिन्नर : गेल्या आठवड्यात पंचायत समितीसाठी मतदान झाल्यानंतर नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांची शिवसेना व भाजपा यांनी स्वतंत्ररीत्या गटनोंदणी केली आहे.
नायगाव गणाचे पंचायत समिती सदस्य संग्राम शिवाजी कातकाडे यांची शिवसेनेने गटनेता म्हणून निवड केली आहे. शिवसेनेच्या आठ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गटनोंदणी केली. त्यात कातकाडे यांची शिवसेनेचा गटनेता म्हणून निवड करण्यात आली.
भाजपाच्या चार सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून गटनोंदणी केली. देवपूर गणाचे सदस्य विजय सूर्यभान गडाख यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. बारा सदस्य संख्या असलेल्या सिन्नर पंचायत समितीत शिवसेनेचे बहुमत आहे. शिवसेनेचे आठ तर भाजपाचे चार सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे सभापती व उपसभापतिपदी शिवसेनेच्या सदस्यांना संधी मिळणार आहे. सिन्नर पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असून माळेगाव गणाचे सदस्य भगवान पथवे व मुसळगाव गणाच्या सदस्य सुमन बर्डे या दोघांपैकी एकाला शिवसेनेकडून सभापतिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)