टाकेदच्या कातकरी कुटुंबांना अखेर मिळाले रेशनवरील धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:14 AM2021-05-27T04:14:34+5:302021-05-27T04:14:34+5:30
सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी गेल्या वर्षभरापासून याबाबतचा पत्रव्यवहार चालवला होता. तसेच आमदार माणिकराव कोकाटे, जि.प. सदस्या सीमंतिनी ...
सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी गेल्या वर्षभरापासून याबाबतचा पत्रव्यवहार चालवला होता. तसेच आमदार माणिकराव कोकाटे, जि.प. सदस्या सीमंतिनी कोकाटे, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचीही याबाबत भेट घेऊन कैफियत मांडण्यात आली होती. अखेर शासनस्तरावर दखल घेतली जाऊन सर्व आदिम कातकरी कुटुंबांना जि.प.सदस्या सीमंतिनी कोकाटे, सरपंच ताराबाई बांबळे यांच्या हस्ते रेशनकार्ड प्रदान करण्यात आले. त्यानंतर बांबळेवाडी येथील स्वस्त धान्य दुकानात जवळपास २७ कुटुंबांना शासनाचे मोफत व हक्काचे रेशन धान्य वाटप करण्यात आले. कोरोना काळात हाताला काम नाही. हक्काचा रोजगार नाही. असे अनेक पोटाचे प्रश्न आदिवासी भूमिहीन बेरोजगार कातकरी कुटुंबांसमोर उभे असताना कोरोनाच्या महामारीत धान्य मिळावे अशी कातकरी समाज बांधवांची गेल्या अनेक दिवसांची मागणी होती. त्यांना नुकतेच रेशनकार्ड व रेशन धान्य भेटल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
कोट...
गेल्या अनेक वर्षांपासून रेशनकार्डपासून वंचित असलेल्या कातकरी कुटुंबांना हक्काचे रेशनकार्ड व रेशन धान्य मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी याची दखल घेत प्रत्यक्षात कातकरी कुटुंबांना रेशनकार्ड व हक्काचे रेशन धान्य मिळवून दिल्याने समाधान वाटत आहे.
- सौ. ताराबाई बांबळे, सरपंच, टाकेद बुद्रूक
फोटो : २६ टाकेद कातकारी
सर्वतीर्थ टाकेद येथील आदिम कातकरी बांधवांना मोफत रेशन धान्य वाटप करताना सरपंच ताराबाई बांबळे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, पोलीस पाटील प्रभाकर गायकवाड, ज्येष्ठ नागरिक आबाजी बारे, बाळू नांगरे, सदस्या सुशीला भवारी, केशव बांबळे आदी.
===Photopath===
260521\26nsk_19_26052021_13.jpg
===Caption===
फोटो : २६ टाकेद कातकारीसर्वतीर्थ टाकेद येथील आदिम कातकरी बांधवांना मोफत रेशनधान्य वाटप करतांना सरपंच ताराबाई बांबळे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, पोलीस पाटील प्रभाकर गायकवाड, जेष्ठ नागरिक आबाजी बारे, बाळू नांगरे, सदस्या सुशीला भवारी,केशव बांबळे आदी.