राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत कौशल मोराणकर नाशकात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:47+5:302021-06-16T04:20:47+5:30
नाशिक : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत १३ डिसेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला ...
नाशिक : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत १३ डिसेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चाचणी परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे. या परीक्षेत नाशकातून कौशल मोराणकर याने खुल्या गटातून प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्यात बाराव्या स्थानावर मजल मारली आहे. जिल्ह्यात ओबीसी गटातून अथर्व पवार, एससीतून ओजस सावकारे यांनी अव्वल स्थान पटकावले आहे.
प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे, त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करणे. या हेतूने दहावीतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातून खुल्या गटात वेदांत घुगे, आर्या जोशी, अभिजित राठोड, यश बिन्नर, सौरभ नाणकर, अभिषेक गुप्ता, आगम कासलीवाल, सारा अहिरे, तनिषा हासे, सानिका सैंदाणे आदींनी यश संपादन केले. ओबीसी गटातून अथर्व पवार याने प्रथम क्रमांक पटकावला असून, सिद्धी गुंजाळ, वेदांत विसपुते, प्रथमेश बोरसे, उत्कर्ष बागड, वेदांत माळोदे, अथर्व दुबे, विनीत हिरे, ललित सोनवणे, ॲनी रिषी, मिहीर वाणी, अनिकेत शेवाळे, दर्शन ठाकरे यांनी यश संपादन केले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून निहल मेहरोलियाने प्रथम क्रमांक पटकावला असून, ओजस सावकारे, ओम नुनसे, प्राजक्ता वाघ, आयुष्का कांबळे, राज सिलावत आदींनी तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून वैभव जगताप यांनी यश संपादन करीत राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या परीक्षेत आपले स्थान निश्चित केले आहे.