कौटखेडे गावाने कोरोनाला दाखवला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:10 AM2021-06-11T04:10:46+5:302021-06-11T04:10:46+5:30

जळगाव नेऊर : जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कौटखेडे या गावाने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देखील गावात कोरोनाचा ...

Kautkhede village showed the corona | कौटखेडे गावाने कोरोनाला दाखवला ठेंगा

कौटखेडे गावाने कोरोनाला दाखवला ठेंगा

Next

जळगाव नेऊर : जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कौटखेडे या गावाने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देखील गावात कोरोनाचा शिरकाव होऊ दिलेला नाही. विविध उपाययोजनांमुळे कोरोनाला वेशीवरच रोखण्यात ग्रामस्थांना यश आले.

येवला तालुक्यातील १२४ पैकी १२३ गावांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले.

मात्र, कौटखेडे हे गाव त्याला अपवाद ठरले आहे.

कोरोना संसर्ग आपल्या गावात येऊ नये

म्हणून अनेक गावांनी विविध उपाययोजना

आखल्या आणि कोरोनाला गावच्या वेशीवरच रोखले. कौटखेडे या गावाने अशाच काही उपाययोजना

केल्या आणि गावात कोरोनाचा शिरकावच होऊ न

दिल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतसुद्धा हे गाव

कोरोनामुक्त असल्याचे पाहावयास मिळाले.

येवला तालुक्यापासून १७ किलोमीटर तळवाडे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या ६०० लोकसंख्येच्या कौटखेडे गावात कोरोनाचा

शिरकाव होऊ नये म्हणून विविध उपाययोजना आखण्यात आल्या. गावातून कोणाला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचे असेल तरच त्याला बाहेर

सोडण्यात आले. तसेच आल्यानंतरही त्याच्याबाबत खबरदारी घेण्यात आली. गावातसुद्धा विनाकारण कोणी फिरू नये, असा नियम

आखण्यात आला. विशेष म्हणजे मागील वर्षीसुद्धा या गावात

कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही आणि

याहीवर्षी येवला तालुक्यात हे गाव त्याला अपवाद

ठरले. या गावात तालुका आरोग्य यंत्रणेकडून प्रबोधन

करण्यात आले. गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांनी जनजागृती करत ग्रामस्थांना

कोरोनापासून वाचण्यासाठीचे महत्त्व पटवून दिले

आणि दर आठवड्याला तपासणी सुरू केली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले.

कोट...

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अंतर्गत शासनाच्या नियमांचे पालन करून गावात गल्लोगल्ली औषध फवारणी, गावात भरणारा आठवडा बाजार बंद करून गावात येणाऱ्या प्रत्येक माणसाची विचारपूस, तपासणी केली जात होती. शासनस्तरावरून वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याने गावात कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही.

- संतोष आरखडे, सरपंच- ग्रुप ग्रामपंचायत तळवाडे

फोटो- ०९ कौटखेडे कोरोना

येवला तालुक्यातील तळवाडे, कौटखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने औषधांची फवारणी करताना कर्मचारी.

===Photopath===

090621\410409nsk_26_09062021_13.jpg

===Caption===

फोटो- ०९ कौटखेडा कोरोना येवला तालुक्यातील तळवाडे, कौटखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने औषधांची फवारणी करतांना कर्मचारी.

Web Title: Kautkhede village showed the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.