पिंपळगाव बसवंतला कावड यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 05:56 PM2019-12-02T17:56:52+5:302019-12-02T17:58:11+5:30
पिंपळगाव बसवंत: सालाबाद प्रमाणे यंदाही चंपाषष्टी च्या दिवशी पिंपळगाव बसवंत अंबिका नगर व सातीवड येथे कावड मिरवणूक व देवाच्या नावाची पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. शहरातील खंडेराव महाराज उत्सव समितीने शोभायात्रा व कावड मिरवणुकीचे आयोजन केले होते. आठ दिवसापासून अंबिका नगर व सातीवड येथील खंडेराव मंदिरात जागरण,गोंधळ तसेच भारु ड ,भजन आणि कीर्तनाच्या कार्यक्र माने परिसर दणाणून गेला होता.
खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त सोमवारी सकाळी देवाच्या मूर्तीचा गंगाजलभिषेक करण्यात आला. सकाळी कावड व शोभा यात्रा मिरवणूक काढण्यात आली. व दुपारी ा नवसपूर्ती व राहडी कार्यक्र म संप्पन झाला. सातीवड येथे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म संपन झाला.तर रात्री पासून संपूर्ण रात्रभर भजन कीर्तन व जागरण गोंधळ, घालून सकाळी पहाटे देवाची लंगर तोडण्याचा कार्यक्र म संपन करून या कार्यक्र माची सांगता करण्यात आली.
खंडेराव महाराज यात्रोत्सवा निमित्त जुना आग्ररोड खंडेराव मंदिर परिसरात यात्रा भरत असल्याने परिसरात खाद्य पदार्थ, खेळणी, वस्तू आदींसह विविध वस्तू खेरदी व दर्शना साठी भाविकांची गर्दी होते.
यावेळी यावेळी शहरातील मंदिरात सोमनाथ विधाते ,गोविंद सोनवणे ,संतोष विधाते , संजय सोनवणे,अमित डेरे,कृष्णा डोळस, बाजीराव विधाते,गोपीनाथ विधाते ,पुंडलिक विधाते, योगेश विधाते ,विष्णू विधाते,अशोक मौले आदी तसेच
अंबिका नगर येथे राजेंद्र सोनवणे,शिवाजी बेंडकुळे,माणिक वाघ,शिवराम गवारे,जीवाला गांगुर्डे,दिलीप पीठे,रघुनाथ गांगुर्डे, दत्तू झनकर ,राजू डंबाळे,संपत धुळे,देवराम वटाणे,अंबादास खेरणार,गणेश ठाकरे, आदी भक्त मंडळीनी कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले