काजवा महोत्सव : पर्यटकांच्या धिंगाण्याला लागणार चाप

By Admin | Published: May 22, 2017 03:44 PM2017-05-22T15:44:00+5:302017-05-22T15:54:51+5:30

नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेरेषवरील परिसरात भरणाऱ्या काजवा महोत्सवामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण महिना ते दीड महिना कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरातील नैसर्गिक जैवविविधता धोक्यात येते.

Kazavah Festival: Archers to visit tourists | काजवा महोत्सव : पर्यटकांच्या धिंगाण्याला लागणार चाप

काजवा महोत्सव : पर्यटकांच्या धिंगाण्याला लागणार चाप

googlenewsNext

नाशिक : नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेरेषवरील परिसरात भरणाऱ्या काजवा महोत्सवामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण महिना ते दीड महिना कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरातील नैसर्गिक जैवविविधता धोक्यात येते. पर्यटकांचा धिंगाणा सुरक्षेला तडा देणारा ठरतो. यामुळे या भागात वनविभाग व अकोला पोलीस ठाणेअंतर्गत गस्त वाढविली जाणार असून वाहनांची तपासणी केली जाणार आहे. मद्यप्राशनला संपुर्णपणे आळा घालून हा परिसर पर्यटकांच्या धिंगाण्यापासून सुरक्षित करण्यासाठी वनविभाग व वन्यजीव विभाग यावर्षी प्रयत्न करणार आहेत. काजवा महोत्सवाचे ‘ब्रॅन्डिंग’ मोठ्या प्रमाणात झाल्याने दरवर्षी या ठिकाणी सुमारे दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत पर्यटकांची संध्याकाळपासून तर रात्री उशीरापर्यंत मोठी गर्दी उसळते. या अभयारण्याच्या क्षेत्रात सादडा, बेहडा, उंबर, बोंडारा, करंज, हिरडा या वृक्षांची संख्या जास्त असून या वृक्षांवर काजव्यांची संख्या जास्त असते. काजवे बिलांमधून बाहेर येऊन रात्रीच्या वेळी झाडांची पाने खातात. त्यामुळे ते चमकताना दिसतात. त्यांची चमचम बघण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते.
यावेळी प्रामाणिकपणे निसर्ग अनुभवणारे व निसर्गासोबत मैत्री जपणारे पर्यटक अपवादानेच येथे येतात. त्यांच्या तुलनेने धिंगाणा घालणारे पर्यटक येथे जास्त येतात. यावेळी वाहनांच्या हॉर्नचा कर्णकर्कश आवाज, साऊंडचा दणदणाट, वाहनांच्या दिव्यांचा लख्ख प्रकाश, प्लॅस्टिकचा कचरा, दारुच्या रित्या झालेल्या बाटल्या अशा सर्व प्रकाराने निसर्गाची अपरिमित हानी होते. यामुळे काजवा महोत्सव बंद करण्याची खरी गरज असल्याचे मतदेखील काही पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. स्थानिक आदिवासींना या काजवा महोत्सवाचा रोजगाराच्या दृष्टीने कवडीचा फायदा होत नाही. महाराष्ट्र पर्यटन विकास महमंडळामार्फत जाणाऱ्या पर्यटकांना वगळले तर कोणतेही पर्यटक जे स्वयंस्फूर्तीने या अभयारण्याच्या परिसरात हजेरी लावतात त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे स्वयंशिस्तीचे पालन किंवा निसर्गाच्या संरक्षणाची काळजी घेतली जात नसल्याचे विदारक चित्र पहावयास मिळते.

Web Title: Kazavah Festival: Archers to visit tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.