के.बी.एच. विद्यालयात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:18+5:302021-03-09T04:17:18+5:30
महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत असलेल्या महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यात सोळा ...
महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत असलेल्या महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यात सोळा वेळा कळसुबाई शिखर सर करून जागतिक विक्रम करणारी माजी दिव्यांग विद्यार्थिनी अंजना प्रधान, सध्या शिर्डी येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत असलेली सारिका केदारे व कोविड काळात कोरोनाबाधितांची अविरत सेवा करणाऱ्या डॉ.श्रद्धा वाकचौरे, सोनाली मोरे, पूनम सातपुते, माधुरी साबळे, शारदा अवकाळे यांचा स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन मनिषा गांगुर्डे यांनी केले तर प्रकाश नरोडे यांनी आभार मानले.
===Photopath===
080321\08nsk_4_08032021_13.jpg
===Caption===
केबीएच विद्यालयात महिला दिननिमित्त सत्कारार्थी महिलांसमवेत महिला कल्याण व तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा क्रांती देवरे यांच्यासह जयवंत बोढारे, रमेश बागुल, सुजाता पवार आदी