नाशिक जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदी भाजपाचे केदा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:19 PM2017-12-23T16:19:32+5:302017-12-23T16:21:52+5:30

सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ क-हे यांच्या उपस्थितीत निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत केदा अहेर यांचे दोन अर्ज दाखल करण्यात आले.

KEDA Aher, BJP president of Nashik District Bank | नाशिक जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदी भाजपाचे केदा अहेर

नाशिक जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदी भाजपाचे केदा अहेर

Next
ठळक मुद्देबिनविरोध : मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचा हस्तक्षेपजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक अखेर भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक अखेर भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली असून, केदा अहेर यांची एकमताने अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहेर यांच्या नावाला हिरवा कंदील दर्शविल्याने अन्य इच्छुकांची नावे मागे पडून केदा अहेर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ क-हे यांच्या उपस्थितीत निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत केदा अहेर यांचे दोन अर्ज दाखल करण्यात आले. त्यातील एका अर्जावर सूचक म्हणून संदीप गुळवे, अनुमोदक माणिकराव कोकाटे तर दुस-या अर्जावर सूचक म्हणून परवेज कोकणी व अनुमोदक गणपतराव पाटील हे होते. साडेअकरा वाजेनंतर अर्जाची छाननी करण्यात आली. एकच अर्ज असल्याने माघारीचा प्रश्नच नसल्याने निवडणूक अधिका-यांनी केदा अहेर यांची बिनविरोध निवड जाहीर केली. तत्पूर्वी सकाळपासून अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांची घालमेल वाढली होती. माणिकराव कोकाटे, परवेज कोकणी व केदा अहेर या तिघांमध्येच रस्सीखेच असल्याने पालकमंत्री कोणाचे नाव जाहीर करतात याकडे साºयांचे लक्ष लागले होते. अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या काही वेळ अगोदरच पालकमंत्र्यांचा सांगावा आल्याने अन्य इच्छुकांनी आपली दावेदारी मागे घेत उलट केदा अहेर यांच्या अर्जावर सूचक, अनुमोदक होत समर्थन दर्शविले. अहेर यांच्या नावाची घोषणा होताच बाहेर जमलेल्या त्यांच्या समर्थकांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी ढोल-ताशावर ठेका धरला.

Web Title: KEDA Aher, BJP president of Nashik District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.