पंतप्रधान मोदींच्या भाषणाने श्रोते मंत्रमुग्ध! त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात घडले केदारनाथ दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 02:07 PM2021-11-05T14:07:50+5:302021-11-05T14:09:40+5:30

Nashik News : केदारनाथमध्ये आद्य शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले.

Kedarnath Darshan took place in the premises of Trimbakeshwar Temple | पंतप्रधान मोदींच्या भाषणाने श्रोते मंत्रमुग्ध! त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात घडले केदारनाथ दर्शन

पंतप्रधान मोदींच्या भाषणाने श्रोते मंत्रमुग्ध! त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात घडले केदारनाथ दर्शन

googlenewsNext

त्र्यंबकेश्वर (नाशिक) - प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर प्रांगणात केदारनाथ येथील सोहळ्याचे अध्यात्मिक अर्थाने केदारनाथाचे दर्शन घडले. केदारनाथ येथील कार्यक्रमाचे प्रक्षेपण त्र्यंबकेश्वर दाखवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. केदारनाथमध्ये आद्य शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले.

सन 2013 मध्ये केदारनाथचा महापूरात केदारनाथचे  मोठे नुकसान झाले होते. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालेल्या विकास कामांचे लोकार्पण केदारनाथ केदारनाथला मोठे वैभव मिळवून देईल, असा विश्वास राज्यातील विरोधी पक्षनेते भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी वरील सोहळ्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. पेट्रोलचे दर केंद्र सरकारने कमी केले आहे. अबकारी कर कमी झाला आहे. राज्य सरकारचा ही येथे संबंध येतो. तरीही राज्य सरकारने ठरवले तर अजून ही दर कमी करता येतील असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

केंद्रीय आरोग्य राज मंत्री भारती पवार, तुषार भोसले तसेच आमंत्रित मंडळी, स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, महंत धनंजय गिरी, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.पोलीस अधिकारी तहसीलदार हे शासकीय यंत्रणेचे लक्ष देऊन होते. यासाठी भव्य मंडप त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात टाकण्यात आला होता. दरम्यान दरवर्षी दिवाळी पाडव्याला त्र्यंबकेश्वर मंदिरावर कापडी रेशमी भगवा ध्वज कळसावर चढवण्यात येतो. असा झेंडा आज लावण्यात आला अशी माहिती सुशांत तुंगार यांनी दिली.
 

Web Title: Kedarnath Darshan took place in the premises of Trimbakeshwar Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.