मनपाची बससेवा हद्दीतच ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:04+5:302021-07-12T04:10:04+5:30
रस्त्यातील झाडांचा अडथळा हटवा नाशिक : रस्त्याच्या मधोमध असलेल्या वृक्षांमुळे अनेकांचा जीव गेला आहे. रस्त्याच्या मधोमध येणारे आणि अपघाताला ...
रस्त्यातील झाडांचा अडथळा हटवा
नाशिक : रस्त्याच्या मधोमध असलेल्या वृक्षांमुळे अनेकांचा जीव गेला आहे. रस्त्याच्या मधोमध येणारे आणि अपघाताला निमंत्रण ठरणारे वृक्ष हटविण्यात यावेत अशी मागणी सचिन वाघ यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाघ यांचा मुलगा आदित्य याचा गंगापूररोडवर झाडाला आदळून अपघातात मृत्यू आला आहे. गंगापूर पोलीस ठाण्याच्या रेकाॅर्डनुसार रस्त्यातील झाडांमुळे जवळपास २५ जणांना जीव गमवावा लागला आहे. गंगापूररोड पेठरोड दिंडोरीरोड, मखमबलाबाद, सिडको तसेच शहरातील अन्य भागात रस्त्यातील मधोमध असलेली झाडे हलवावीत अशी मागणी वाघ यांनी निवेदनात केली आहे.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९६ टक्के
नाशिक : शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याचे चित्र असले तरी जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. धोका अजूनही टळला नसल्याने नागरिकांनी दक्षता घेतली पाहिजे अशा सूचना वारंवार प्रशासनाकडून केल्या जात आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९६.६८ टक्के इतके आहे. शहरात हेच प्रमाणे ९७.९७ टक्के इतके आहे. मालेगावमध्ये ९६.७५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.४४ टक्के इतके आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे एकूण प्रमाण ९७.४३ टक्के इतके आहे.
वृद्धाश्रम परिसरात शंभर वृक्षारोपण
नाशिक : दि नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड नाशिक आणि टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नॅब संचलित वृद्धाश्रम, बेळगाव ढगा परिसरात शंभर वृक्षांचे रोपण करण्यात आले. टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एन. बी. मोरे, सचिव सोनवणे, प्रकाश विसपुते, अक्षय सोनजे यांच्यासह नॅबचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाशचंद्र सुराणा, माजी अध्यक्षा निर्मलाबेन शहा, जयप्रकाश कोटकर, डॉ. टेंभे, नॅबच्या अध्यक्षा ॲड. विद्युलता तातेड, उपाध्यक्ष संगीताबेन शहा, अनिल चव्हाण, विजय टाटीया, ॲड. वसंतराव तोरवणे, शितलभाऊ सुराणा, विशाल सेदाणी, विष्णू ढगे आदी उपस्थित होते.
(फोटो स्कॅनिंगला)
दुचाकी उचलण्याच्या प्रकारावरून तक्रारी
नाशिक : शहरात टोईंग सुरू होऊन अवघे चार दिवस होत नाहीत तोच वाहने उचलण्याच्या प्रकारावरून वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. टोईंग वाहनावरील कर्मचारी ज्या पद्धतीने दुचाकी उचलतात त्यावरून दुचाकी मालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. जिल्हा न्यायालयाबाहेर वाहने उचलताना अनेकांशी वाद होत आहेत. वाहनाचे मडगार्ड, आरसे डॅमेज होण्याच्या तक्रारी वाहनधारकांकडून केल्या जात आहे. नुकसान भरपाईची तरतूद असली तरी गाडीला क्रॅश कधी आला हे सिद्ध करणे कठीण असल्याने वाहनधारकांना नुकसान सहन करावे लागत आहे.
(फोटो०७पीएचजेएल७९)