आपत्तीसाठी यंत्रणा सज्ज ठेवा : राजाराम माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:21 AM2019-05-18T00:21:04+5:302019-05-18T00:21:28+5:30
पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी जिल्हास्तरावर जलद प्रतिसाद यंत्रणा तयार ठेवावी असे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले.
नाशिकरोड : पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी जिल्हास्तरावर जलद प्रतिसाद यंत्रणा तयार ठेवावी असे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक विभागीय मान्सूनपूर्व आढावा बैठकीत माने बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, डॉ. बी.एन.पाटील, विनय गौडा, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, अर्जुन चिखले, नंदुरबार अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, मुख्य अभियंता एच. एस. पगारे, तहसीलदार बबन काकडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माने म्हणाले ेकी, जिल्हा पातळीवर अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार प्रतिसादाविषयी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात याव्या. नियंत्रण कक्षात सर्व संबंधित यंत्रणांचे दूरध्वनी क्रमांक अद्ययावत ठेवावेत. अतिवृष्टीच्या काळात दरड कोसळल्यामुळे बाधीत होणारी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे माने यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांनी आपत्ती संदर्भात आपल्या कार्यक्षेत्राची माहिती करून घेत आपत्तीच्या वेळी उपयोगात येणाºया यंत्रसामुग्रीची पडताळणी करून आवश्यक असल्यास दुरुस्ती करावी. पूरपरिस्थितीत मदत कार्यासाठी उपयुक्त व्यक्ती आणि संस्थाची माहिती तयार ठेवावी. आपत्तीसाठी प्रमाणित कार्यपद्धती अद्ययावत ठेवण्याचे निर्देशही माने यांनी दिले.
यावेळी उपायुक्त दिलीप स्वामी यांनी अतिवृष्टीच्या वेळी पुरामुळे बाधीत होणाºया गावांकडे विशेष लक्ष देण्यात यावे. पूर परिस्थितीत आरोग्य सुविधा तयार ठेवाव्यात. महापालिका क्षेत्रात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी. जलद प्रतिसाद देण्यासाठी मनुष्यबळाचे नियोजन तयार ठेवावे. आपत्तीत मदत करणाºया संस्थांची माहिती संकलित करून त्यांच्याशी पावसाळ्यापूर्वी संवाद साधावा. पाझर तलाव, बंधारे यांची दुरुस्ती करून घ्यावी. आपत्तीच्या वेळी सामुग्रीचे संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे, असे स्वामी यांनी सांगितले. बैठकीला संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.