मेनरोडवर विजेचा लपंडाव सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:29 AM2018-11-06T01:29:03+5:302018-11-06T01:29:21+5:30
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमार, मेनरोड येथे दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झालेली असताना सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नाशिक : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमार, मेनरोड येथे दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झालेली असताना सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यात तीन वेळा मोठा बिघाड झाला होता तर इतर दिवशीही विजेचा लपंडाव सुरूच असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांत तोबा गर्दी झालेली असून, बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड आणि शालिमार येथे तर तोबा गर्दी झालेली आहे. व्यावसायिकांच्या दृष्टीने ही ‘दिवाळी’ असताना खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यात गाडगेमहराज पुतळा परिसरातील विद्युत खाबांवर एकामागोमाग एक शॉर्टसर्किट झाल्याने खांबांवर आग लागली होती. एका दुकानाचा फलक जळून खाक झाला होता. फटाक्यांच्या आवाजाप्रमाणे विद्युत खांबावर आवाज होऊ लागल्याने ग्राहक आणि दुकानदारांचीदेखील पळापळ झाली होती.
महावितरण अधिकारी ‘डिस्कनेट’
खंडित वीजपुरवठ्याबाबत अधिकाºयांना विचारणा केली असताना काहींनी प्रतिसाद दिला नाही तर अन्य अधिकारी याबाबत अनभिज्ञ दिसले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मेनरोडवर सातत्याने होणाºया खंडित वीजपुरवठ्याची तक्रार व्यापारी भ्रमणध्वनीद्वारे करीत असले तरी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पोहचण्यास अधिकारी, कर्मचाºयांना विलंब होत असल्याची तक्रार आहे.१
रविवारी पावसामुळेदेखील मेनरोड, शालिमार, जुने नाशिक परिसरात सुमारे तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. राजेबहाद्दर फिडरवरील ११ केव्ही वाहिनीत बिघाड झाल्याने वीज गायब झाल्याने बराच वेळ परिसर अंधारात होता. पावसामुळे तारांबळ उडालेली असतानाच खंडित वीजपुरवठ्यामुळे दुकानदारांना त्रास सहन करावा लागला.
२ मेनरोड परिसरात विद्युत खांबावर विजेचा भार वाढल्यामुळे फ्युज उडाल्याने मेनरोड, महात्मा गांधी मार्गावरील वीजपुरवठा खंडित झाला होता. सलग होणाºया या बिघाडामुळे व्यापाºयांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही व्यापाºयांनी अभियंत्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.