तक्रारींची नोंद ठेवा... अन्यथा कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:22 AM2019-11-30T00:22:53+5:302019-11-30T01:05:13+5:30
सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामकाजासंदर्भात असलेल्या तक्रारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक उपविभागीय कार्यालयांमध्ये व्हॉट््सअॅप ग्रिव्हनसेस फेडरल योजना सुरू करण्यात आलेली आहे. तथापि, अनेक नागरिकांच्या तक्रारींची नोंद न घेता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जाते. सर्वसामान्यांच्या तक्रारींची रितसर नोंद न ठेवणाºया तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर यापुढे जबाबदारी निश्चित केली जाईल, असे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाºयांना बजावले आहे.
नाशिक : सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामकाजासंदर्भात असलेल्या तक्रारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक उपविभागीय कार्यालयांमध्ये व्हॉट््सअॅप ग्रिव्हनसेस फेडरल योजना सुरू करण्यात आलेली आहे. तथापि, अनेक नागरिकांच्या तक्रारींची नोंद न घेता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जाते. सर्वसामान्यांच्या तक्रारींची रितसर नोंद न ठेवणाºया तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर यापुढे जबाबदारी निश्चित केली जाईल, असे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाºयांना बजावले आहे.
शासकीय कार्यालयात असलेल्या प्रकरणासंदर्भात शासकीय कामाचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाभरातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. येथे आल्यानंतर त्यांना अनेक ठिकाणी फिरावे लागते. यातच त्यांचा दिवसही खर्ची होतो. त्यामुळे त्यांना तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने एक व्हॉट््सअॅप क्रमांक दिलेला आहे. तसेच प्रत्येक उपविभागीय कार्यालयांच्या स्तरावरदेखील व्हॉट््सअॅप क्रमांकावर तक्रार करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांच्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन त्यांचे समाधान करणे हा त्या मागचा हेतू आहे. परंतु अजूनही जिल्हाभरातून नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. स्थानिक पातळीवर त्यांच्या तक्रारींची कोणतीही नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासंदर्भात आणि त्यांचे प्रकरण कुठपर्यंत आले आहे याची माहिती प्रत्येक तक्ररींची नोंद करून तक्रार निकाली काढण्यात आली की प्रलंबित आहे याची माहिती तक्रारकर्त्याला मिळाली पाहिजेच शिवाय त्याचे समाधान करणेदेखील अपेक्षित असून, जिल्ह्णातील सहायक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी तक्रारींची नोंद आणि कामाचे प्राधान्य तक्रारकर्त्यांना कळविणे अपेक्षित आहे. असे न झाल्यामुळे अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संंबंधित अधिकाºयांना तक्रारींची नोंद ठेवा अन्यथा जबाबदार धरण्यात येईल, असे पत्र अधिकाºयांना बजावले आहे. तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांच्या तक्रारीची नोंद आॅनलाइन घेण्यात आलेली नसेल आणि संबंधितास तक्रारींची सद्यस्थिती कळविली नसेल अशा अधिकाºयांवर यापुढे जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी अधिकाºयांना कळविले आहे.