पाऊसाअभावी पिके लागली कोमेजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 08:44 PM2019-07-18T20:44:56+5:302019-07-18T20:45:17+5:30
खामखेडा : गेल्या आठ दिवसापासून पाऊसाने हुकवणी दिल्याने पिके पाऊसा अभावी कोमजू लागली असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरड गेल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरण्यात पाऊस झाला असला तरी देवळा तालुका काही भागामघ्ये अगदी अल्पशा पाऊस झाला. या अल्पशा पाऊसावर शेतकऱ्याने मका, बाजरी, भुईमूग आदी पिकाची पेरणी केली. खरे तर पिकाच्या पेरणीसाठी अठरा इंच पर्यत पाऊसाची ओल पाहिजे .
खामखेडा : गेल्या आठ दिवसापासून पाऊसाने हुकवणी दिल्याने पिके पाऊसा अभावी कोमजू लागली असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
रोहिणी, मृग नक्षत्र कोरड गेल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरण्यात पाऊस झाला असला तरी देवळा तालुका काही भागामघ्ये अगदी अल्पशा पाऊस झाला. या अल्पशा पाऊसावर शेतकऱ्याने मका, बाजरी, भुईमूग आदी पिकाची पेरणी केली. खरे तर पिकाच्या पेरणीसाठी अठरा इंच पर्यत पाऊसाची ओल पाहिजे .
कारण पिकाची उगवण झाल्यानंतर थोडेसे पीक मोठी झाल्यावर पिकाचे मुळ खोलवर अठरा इंच पर्यत जातात. परंतु या अल्पशा पाऊसाने जमिनीचा ओलावा सह इंच होता. त्यावर शेतकºयाने पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरूवात केली. पुढे पाऊस पडेल या आशेवर शेतकºयाने महागडी बियाणे घेऊन पिकाची पेरणी केली आहे.
काही ठिकाणी पिकांची थोड्याफार प्रमाणात पिकांची उगवण झालेली आहे. पिके थोडी मोठी झाल्याने त्याची पाण्याची भूक वाढली आहे. परंतु पेरणीनंतर पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने, शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहे. उन्हाची तीव्रता वाढली असून, पाण्याअभावी पिके कोमेजू लागली आहेत. येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उदभवू शकते, अशी स्थिती आहे. गतवर्षीच्या दुष्काळानंतर यंदा समाधानकारक पाऊस होऊन, मागील वर्षाची तूट, नुकसान भरून निघेल अशी शेतकºयांची अपेक्षा होती. मात्र त्यांच्या आशेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. जूलै महिन्याच्या पंधरा दिवसाहून अधिक कालावधी होत आला आहे. परंतु या पंधरा दिवसामघ्ये एकदाही दमदार पाऊस झाला नाही.
पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अद्याप निट पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा तरी खरीप हंगामातील पीके हाती लागतील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान काही शेतकºयांनी जून महिन्यात शेवटी झालेल्या अल्पशा पावसावर पेरणी केली होती. त्या पिकांची उगवण झालेली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला होता. मात्र आता गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिलेली आहे.
पाऊस नाही व उन्हाची तीव्रता वाढल्याने, काही ठिकाणी पीके कोमेजू लागली आहेत. येत्या आठवड्यात पाऊस झाला नाही तर आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते असा अंदाज आहे.
पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार का? अशी भिती आता शेतकºयांना सतावू लागलेला आहे.