नाशिकमधील केरळी, मुस्लीम बांधवांतर्फे पूरग्रस्तांना भरघोस मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:48 AM2018-08-30T00:48:42+5:302018-08-30T00:48:58+5:30
केरळमध्ये पावसाने घातलेल्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या केरळमध्ये सर्वस्तरातून विविध स्वरूपात मदतीचा ओघ सुरू असताना सिडकोतून मोठ्या प्रमाणात केरळी बांधवांनी आपल्या बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
सिडको : केरळमध्ये पावसाने घातलेल्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या केरळमध्ये सर्वस्तरातून विविध स्वरूपात मदतीचा ओघ सुरू असताना सिडकोतून मोठ्या प्रमाणात केरळी बांधवांनी आपल्या बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सिडकोतील मुस्लीम बांधवांनी फिरदोस मशीदमधील शुक्र वारच्या नमाज पठनानंतर खतीब ए शहर हाफीज हिसोमोद्दीन खतीब यांनी केलेल्या आवाहनानंतर अवघ्या एका तासात बावीस हजार रु पयांचा निधी संकलित करण्यात आला, तर नमाज पठणात केरळमधील नागरिकांसाठी विशेष दुवा यावेळी करण्यात आली. सदर निधी संकलनांसाठी मोईन शेख, साजिद पटेल, नवीद जहांगिरदार, जावेद शेख, मोहम्मद शेख आदी मुस्लीम बांधवांनी सहकार्य केले. दुसरीकडे नाशिक मल्याळी कल्चरल असोसिएशनतर्फे सुमारे दोन ट्रक साहित्य संकलित करण्यात आले. यामध्ये किराणा माल, कपडे, औषधी, पिण्याचे पाणी आदी वस्तूंचा समावेश आहे. तर रोख स्वरूपात जमा झालेली एक लाख रु पयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे. यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष गोगुलम पिल्ले, अनुव पुष्पानं, सोनू जॉर्ज, गिरीश नायर, विन्न्न पिल्ले, राधाकृष्ण पिल्ले, नीतू मनोज, विपीन भास्कर आदींसह मायको, बॉश, संदीप फाउंडेशन, एच.ए.एल. शिवसरस्वती आदींचे सहकार्य मिळाले आहे.
देवळाली कॅम्प येथून केरळला मदत रवाना
देवळाली कॅम्प येथे केरळ पूरग्रस्तांसाठी गुरू सोशल फाउंडेशन, इनरव्हील क्लब, सावन कृपाल रूहानी मिशन व मल्याळी असोसिएशनच्या वतीने जमा झालेले साहित्य केरळला रवाना करण्यात आले. जमा झालेले अन्नधान्य, कपडे, औषधे व जीवनावश्यक वस्तू आदी साहित्य केरळला पाठविण्यात आले. यावेळी प्रशांत कापसे, शिनू जोस, जिशान खान, शिबू जोस, वाजिद सय्यद, नितीन गायकवाड, दत्ता सुजगुरे, जुबीन शहा, संजय गोडसे, राजेंद्र सोनवणे, मनीष चावला, अनिश साळुंके, आरिफ शेख, जहिर सय्यद, संजय गायकवाड, मनोज गायकवाड, विनोद सारस आदी उपस्थित होते.