केवडीबन म्हसोबा महाराज यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 01:12 AM2019-05-20T01:12:50+5:302019-05-20T01:13:21+5:30
शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केवडीबन येथील श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला विधीवत सोहळ्याने उत्साहात प्रारंभ झाला. महापूजा, आरती, बोहाडा सोंग नाचविणे आदींसह विविध धार्मिक कार्यक्र म आणि भाविकांची अमाप गर्दी अशा भक्तिमय वातावरणात यात्रोत्सवात रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
पंचवटी : शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केवडीबन येथील श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला विधीवत सोहळ्याने उत्साहात प्रारंभ झाला. महापूजा, आरती, बोहाडा सोंग नाचविणे आदींसह विविध धार्मिक कार्यक्र म आणि भाविकांची अमाप गर्दी अशा भक्तिमय वातावरणात यात्रोत्सवात रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
तपोवनातील श्री म्हसोबा महाराज बहुउद्देशीय मंडळातर्फे केवडीबनातील म्हसोबा महाराज मंदिरात मे महिन्यात दरवर्षी यात्रेचे आयोजन केले जाते. रविवारी सकाळी यात्रेची सुरुवात पहाटे ६ वाजता म्हसोबा महाराजांच्या महापूजेने करण्यात आली. उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री सत्यनारायण पूजन झाले. सकाळी १० वाजता पंचवटी महाविद्यालय ते केवडीबन देवस्थानपर्यंत सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येऊन ध्वजाची स्थापना करण्यात आली. यावेळी बोहड्याच्या कार्यक्र मात पौराणिक काळातील विविध देवीदेवतांचे सोंगे मिरविण्यात आले. वाद्याच्या तालावर दशावतारी सोंगे म्हसोबा महाराज यात्रेतील आकर्षण ठरले. त्यानंतर दुपारी जनार्दन स्वामी आश्रमाचे संतोषगिरी महाराज, रामगिरी महाराज यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. सायंकाळी देवी व म्हसोबा महाराज यांचे युद्ध देखावा झाल्यानंतर कार्यक्र माची सांगता करण्यात आली.
म्हसोबा महाराज यात्रोत्सवाला रामगिरी महाराज, मनकामेश्वर मंदिराचे परमेश्वरदास महाराज, श्रीराम शक्तिपीठाचे धर्माचार्य बालब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य महाराज, श्रवणगिरी महाराज, संतोषगिरी महाराज आदी साधू- महंतांसह आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार जयंत जाधव, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, नगरसेवक रु ची कुंभारकर, प्रियंका माने आदींसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्र माचे संयोजन रमेश कचरे, ज्ञानेश्वर सोनवणे, दत्तात्रय लिलके, कैलास क्षीरसागर, सुधाकर चव्हाण आदींनी केले होते. यात्रोत्सव निमित्ताने तपोवन केवडीबन श्री म्हसोबा महाराज मंदिरात शेकडो भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.