ब्राह्मणगावी सत्तेची चावी अपक्षांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 10:33 PM2021-01-19T22:33:41+5:302021-01-20T01:30:37+5:30
ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला असून, दोन्ही पॅनलकडे सात सात उमेदवार असून, सत्तेची चावी तिन्ही अपक्षांच्या हाती आहे. त्यात लक्ष वेधून घेणाऱ्या लढतीमध्ये माजी सदस्यांपैकी माजी सरपंच सरला राघो अहिरे व माजी सरपंच सुभाष पंढरीनाथ अहिरे यांना पराभव पत्करावा लागला. माजी सदस्यांमध्ये किरण मधुकर अहिरे पुन्हा विजयी झाले आहेत.
ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला असून, दोन्ही पॅनलकडे सात सात उमेदवार असून, सत्तेची चावी तिन्ही अपक्षांच्या हाती आहे. त्यात लक्ष वेधून घेणाऱ्या लढतीमध्ये माजी सदस्यांपैकी माजी सरपंच सरला राघो अहिरे व माजी सरपंच सुभाष पंढरीनाथ अहिरे यांना पराभव पत्करावा लागला. माजी सदस्यांमध्ये किरण मधुकर अहिरे पुन्हा विजयी झाले आहेत.
परिवर्तन पॅनलला ६ जागा, नम्रता पॅनल ७ जागा व एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. आता सरपंच पदाचे आरक्षण कोणते निघते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आरक्षणमध्ये अनुसूचित जमाती निघाल्यास दोन्ही पॅनलकडे अनुसूचित जमातीची स्त्री, पुरुष उमेदवार आहेत. मात्र, आरक्षणामध्ये अनुसूचित जातीसाठी निघाल्यास अनुसूचित जाती स्त्री, पुरुष, उमेदवार हे फक्त परिवर्तन पॅनलकडे आहेत, हे विशेष आहे.
नम्रता पॅनलचे विजयी उमेदवार रत्नाकर सुदाम अहिरे, नर्मदा रामदास सोनवणे, वंदना माधव पगार, कैलास शिवामन नवरे, अरुण त्रांबक अहिरे, मयुरी सुमेरासिंह परदेशी, प्रतिभा कैलास अहिरे, तसेच परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार शोभा सुभाष अहिरे, रत्ना समाधान माळी, किरण मधुकर अहिरे, रेखा संदीप अहिरे, बापू तुळशीराम खरे, ज्योती विश्वास खरे, तर अपक्ष उमेदवार केदा बापू ढेपले विजयी झाले.
निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन पॅनलचे विनोद सीताराम अहिरे हे बिनविरोध निवडले आहेत. सुनंदा यशवंत माळी, जनार्दन नामदेव सोनवणे, हे दोन्ही उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत प्रभाग ५ मध्ये किरण मधुकर अहिरे व विनोद सीताराम अहिरे हे दोन उमेदवार मागील सदस्यांपैकी उमेदवार असून, अन्य १५ उमेदवार हे नवखे आहेत.
मविप्र उपसभापतींच्या पत्नी पराभूत
निवडणुकीत तीन कुटुंबातील दोन दोन उमेदवार उभे होते. त्यात प्रभाग पाचमध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपसभापती राघो अहिरे यांच्या पत्नी सरला राघो अहिरे यांचा पराभव झाला, तर त्यांच्याच घरातील त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे संचालक यशवंत बापू अहिरे यांच्या सूनबाई रेखा संदीप अहिरे या विजयी झाल्या. प्रभाग पाचमध्ये कैलास ऊखा अहिरे पराभूत झाले, तर त्यांच्या पत्नी प्रतिभा कैलास अहिरे प्रभाग सहामध्ये विजयी झाल्या. प्रभाग पाचमध्ये किरण मधुकर अहिरे हे विजयी झाले, तर प्रभाग सहामध्ये त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या भावजाई रत्ना सुनील अहिरे या पराभूत झाल्या. या लढतींकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.