तरसाळी ग्रामपंचायतीत सत्तेच्या चाव्या‘समर्थ’च्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 05:53 PM2021-01-19T17:53:50+5:302021-01-19T17:54:55+5:30

वीरगाव : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत समर्थ ग्रामविकास या सत्ताधारी पॅनलने बाजी मारत सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी समर्थ ग्रामविकास पॅनलला सहा जागा मिळाल्या, तर विरोधी बंडूबाबा ग्रामविकास पॅनलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.

The keys of power in Tarsali Gram Panchayat are in the hands of 'Samarth' | तरसाळी ग्रामपंचायतीत सत्तेच्या चाव्या‘समर्थ’च्या हाती

तरसाळी ग्रामपंचायतीत सत्तेच्या चाव्या‘समर्थ’च्या हाती

Next
ठळक मुद्दे सत्ताधारी गटाला बहुमत; बंडूबाबा पॅनलला तीन जागा

येथील ग्रामपंचायतीची सत्ता वर्षानुवर्षे एका विशिष्ट गटाच्या हातातच राहिल्यानंतर पाच वर्षांपूर्वी लखन पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने ही सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळविले होते. यानंतर पाच वर्षांच्या कालावधीत केलेल्या विकासकामांच्या जोरावर पवार यांचे सत्ताधारी पॅनल पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले होते. विरोधी बंडूबाबा ग्रामविकास पॅनलने सत्ताधारी गटापुढे मोठे आव्हान उभे केले होते. मात्र मतदारांनी सलग दुसऱ्यांदा पवार यांच्या सत्ताधारी गटाच्या हातीच सत्तेची चावी दिली. विजयी झालेल्या उमेदवार (कंसात मिळालेली मते) असे- वॉर्ड क्र. १ मधून दीपक रौंदळ (२७०), अर्चना रौंदळ (२८७), अनिता रौंदळ (२७१) वॉर्ड क्र. २ मध्ये लखन पवार (१८७), काळू पिंपळसे (१८४), निंबाबाई माळी (बिनविरोध), तर वॉर्ड क्र. ३ मध्ये नामदेव बोरसे (३३२), कमल गांगुर्डे (३१६), मंगल मोहन (३१२) यांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी गटाला वॉर्ड क्र. १ मधील तीनही जागा मिळाल्या तर सत्ताधारी गटाला वॉर्ड क्र. २ व ३ मधील प्रत्येकी तीन अशा सहा जागा मिळाल्या.

Web Title: The keys of power in Tarsali Gram Panchayat are in the hands of 'Samarth'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.