चाव्या, शिक्के प्रशासनाकडे सुपूर्द

By admin | Published: November 17, 2016 10:59 PM2016-11-17T22:59:14+5:302016-11-17T23:03:14+5:30

कळवण, पेठ : आंदोलनात ग्रामसेवक संघटनेचा सहभाग

The keys, stamps, handed over to the administration | चाव्या, शिक्के प्रशासनाकडे सुपूर्द

चाव्या, शिक्के प्रशासनाकडे सुपूर्द

Next

 कळवण : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डीएनई-१३६) यांनी पुकारलेल्या काम बंद व असहकार आंदोलनाला पाठिंबा देऊन कळवण तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेने गुरुवारपासून (दि. १७ नोव्हेंबर) काम बंद आंदोलन सुरू केले असून, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यालयांना कुलूप लावून कुलपाच्या चाव्या व ग्रामपंचायतींचे शासकीय कामकाजात वापरले जाणारे सरपंच, ग्रामसेवक आदि शिक्के कळवण पंचायत समिती प्रशासनाकडे सुपूर्द करून काम बंद आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित प्रश्नाविषयी मागील दीड वर्षापासून राज्य युनियन महाराष्ट्र शासनाशी चर्चा करीत आहे. परंतु शासन स्तरावर ग्रामसेवकांच्या मागणीबाबत कोणताही सकारात्मक निर्णय होत नसल्याने संघटनेने शांततेच्या मार्गाने असहकार व काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे.
यापूर्वी दि. ७ नोव्हेंबर, ११ नोव्हेंबर व १५ नोव्हेंबर रोजी क्र मश: पंचायत समिती, जिल्हा परिषद व विभागीय आयुक्तालय नाशिक येथे केलेल्या एकदिवसीय आंदोलनानंतर दि. १७ नोव्हेंबरपासून बेमुदत असहकार आंदोलनाला सुरुवात केली आहे.
या आंदोलनास कंत्राटी ग्रामसेवक वगळता सर्व ग्रामसेवकांनी एकजुटीने पाठिंबा दिला असल्याची माहिती कळवण ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष पी. एस. खिल्लारी, सरचिटणीस रवींद्र ठाकरे, भाऊराव ठाकरे, विजय देवरे, एस. टी. पाटील यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: The keys, stamps, handed over to the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.