केजीएस कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 05:44 PM2018-10-25T17:44:30+5:302018-10-25T17:44:49+5:30

निफाड : तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील केजिएस शुगर अँड इन्फ्रा कार्पोरेशन या कारखान्याचा पाचवा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न झाला.

KGS factory boiler fire sign | केजीएस कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन

केजीएस कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन

Next

निफाड : तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील केजिएस शुगर अँड इन्फ्रा कार्पोरेशन या कारखान्याचा पाचवा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न झाला.
या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, रतन पाटील वडघुले , वसंत कांडेकर , सदाशिव सांगळे ,सुदर्शन रायते , भिकाजी सानप आदी मान्यवरांच्या हस्ते कारखान्याच्या बॉयलरची ब्रह्मवृंदाच्या साक्षीने , मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात आली व बॉयलर अग्निपदीपन करण्यात आले. समारंभानंतर कारखान्याच्या सभागृहात आयोजित कार्यक्र मात बोलतांना प्रल्हाद पाटील कराड म्हणाले की, केजीएस कारखान्याची यंत्रसामुग्री अत्याधुनिक आहे. अत्यंत कमी संख्येने असणाऱ्या कामगारांवर हा कारखाना चालतो . या गळीत हंगामात पुरेसा ऊस पुरवठा झाल्यास ऊस उत्पादक शेतकºयांना जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तालुक्यातील व परिसरातील ऊस उत्पादक शेतकºयांनी या कारखान्यास ऊस पुरवठा करावा असे आवाहन कराड यांनी केले.
याप्रसंगी रतन वडघुले , कारखान्याचे संचालक बाळासाहेब कराड , शरद कुटे ,विजय आव्हाड यांची भाषणे झाल. याप्रसंगी उद्धव कुटे , नानासाहेब वडघुले , शिवाजी केदार ,श्याम शिंदे , प्रवीण घुगे , सोमनाथ शिंदे , ज्ञानेश्र्वर खाडे , कैलास डेर्ले, देविदास खाडे ,गणेश बोडके ,यांच्यासह उसउत्पादक शेतकरी उपस्थित होते.

 

Web Title: KGS factory boiler fire sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.