मालेगाव जंगलातील ‘खैर’ तस्कर टोळीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:57 PM2017-10-29T23:57:35+5:302017-10-30T00:30:30+5:30

तस्करीसाठी मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील सुमारे २२५ एकरवर पसरलेल्या जंगलात खैर वृक्षांची कत्तल करणाºया तस्कर टोळीचा छडा नाशिक वन कार्यालयातील गस्त पथकाने लावला.

'Khaar' trauma gang in Malegaon forest | मालेगाव जंगलातील ‘खैर’ तस्कर टोळीचा छडा

मालेगाव जंगलातील ‘खैर’ तस्कर टोळीचा छडा

Next

नाशिक : तस्करीसाठी मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील सुमारे २२५ एकरवर पसरलेल्या जंगलात खैर वृक्षांची कत्तल करणाºया तस्कर टोळीचा छडा नाशिक वन कार्यालयातील गस्त पथकाने लावला.
गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाच्या मालकाच्या मुसक्या पिंपळनेर येथून आवळल्यानंतर टोळीतील स्थानिक गुन्हेगारांसह त्यांना अभय देणाºया वनअधिकारी-कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. संबंधित वन कर्मचाºयांकडून पथकाला योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचे बोलले जात असून, जंगलाच्या परिसरातील गावांमधील संशयितांचा बचाव स्थानिक वन कर्मचाºयांकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे.
चिंचवे, पोहाणे, गाळणा पंचक्रोशीच्या शिवारात असलेल्या २२५ एकरवर असलेल्या जंगलामधील चारशेहून अधिक खैर वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने १० आॅक्टोबर रोजी उघडकीस आणून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. यानंतर नाशिकचे मुख्य वनसंरक्षक एस. रामाराव यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत स्वतंत्र पथकाची नियुक्ती करून चौकशी सुरू केली. पंचनामा अहवालानंतर रामाराव यांनी वनविभागाच्या मालेगाव उपविभागातील सात वनकर्मचाºयांवर जबाबदारी निश्चित करत त्यांना या कत्तलीप्रकरणी जबाबदार धरले असून, कार्यालयीन चौकशी सुरू केली आहे.  दरम्यान, तपास पथकाला मालेगाव तालुक्यात खैर तस्करीचे धागेदोरे शोधण्यास यश आले आहे. उंबरपाड्यातून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह मालक बाबुलाल राऊत याला पथकाने ताब्यात घेतले असून, न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.  दरम्यान तस्कर टोळीची धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘त्या’ कर्मचाºयांचे धाबे दणाणले
खैर तस्कर टोळीवर मेहेरनजर दाखविणाºया संशयित वन कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. मुख्य वन संरक्षकांकडून सात कर्मचाºयांची चौकशी सुरू करण्यात आली असून, टोळीतील एक ‘मासा’ गळाला लागल्यामुळे त्याच्याकडून कोठडीदरम्यान अन्य संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या वन कर्मचाºयांनी या प्रकरणात आपले हात काळे केले त्यांचे धाबे दणाणले आहे.
वाहन एक क्रमांक अनेक
खैर तस्करीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांपैकी महिंद्र मॅक्स जीप (एमएच १८, डब्ल्यू ३३४५) वनविभागाने जप्त केली आहे. या वाहनाचा महाराष्टÑातील अस्सल नोंदणी क्रमांक प्रादेशिक परिवहन विभागात असा असला तरी या वाहनाला गुजरातमध्ये जाण्यासाठी महाराष्टÑाची सीमा सोडताना तस्करांकडून (जीजे ०१, डब्ल्यू ३३४५) अशा प्रकारे अदला-बदल केली जात असल्याचे तपासात पुढे आले आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या अजून चार वाहनांचा शोध घेतला जात आहे; मात्र त्या वाहनांच्या क्रमांकामध्येही तफावत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत.

Web Title: 'Khaar' trauma gang in Malegaon forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.