खडकमाळेगाव शाळेत ‘एक धागा शौर्य का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 11:47 PM2020-07-31T23:47:11+5:302020-08-01T01:00:11+5:30

निफाड : खडकमाळेगाव येथील नूतन विद्यालयात ‘एक धागा शौर्य का राखी बंधन की’ हा कार्यक्र म उत्साहात साजरा करण्यात ...

Khadakmalegaon school 'Ek Dhaga Shaurya Ka' | खडकमाळेगाव शाळेत ‘एक धागा शौर्य का’

खडकमाळेगाव येथील नूतन विद्यालयात ‘एक धागा शौर्य का राखी बंधन की’ हा कार्यक्र मप्रसंगी सैनिक योगेश सुखदेव शिंदे आणि रवींद्र भाऊसाहेब शिंदे यांच्याकडे सुपूर्द करतांना अशोक कोळी, सुनील कोयटे, सुनील गायकवाड आदी.

Next
ठळक मुद्देखडकमाळेगाव येथील नूतन विद्यालयात ‘एक धागा शौर्य का राखी बंधन की’ हा कार्यक्र म उत्साहात साजरा करण्यात आला.

निफाड : खडकमाळेगाव येथील नूतन विद्यालयात ‘एक धागा शौर्य का राखी बंधन की’ हा कार्यक्र म उत्साहात साजरा करण्यात आला.
कोरोनामुळे लॉकडाऊन असताना भारतीय जवानांसाठी नूतन विद्यालयातून विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या राख्या खडकमाळेगावचे भूमिपुत्र भारतीय सैनिक योगेश सुखदेव शिंदे आणि रवींद्र भाऊसाहेब शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून योगेश शिंदे, रवींद्र शिंदे यांना गुलाबपुष्प देऊन सुदाम थोरात, पंढरीनाथ मदगे यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्याध्यापक मंगला रायते यांनी विद्यालयाच्या या उपक्रमाबाबतचे विचार व्यक्त केले. यावेळी जवानांचे औक्षण करून राख्या बांधण्यात आल्या. उपशिक्षिका शिर्के आणि विद्यालयातील विद्यार्थिनी जान्हवी गिरीश रायते, साक्षी शिंदे, स्नेहा पिठे यांनी उपस्थित भारतीय सैन्यातील योगेश शिंदे व रवींद्र शिंदे यांचे औक्षण करून राख्या बांधल्या. तसेच तयार केलेल्या राख्या भारतीय जवानांसाठी त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. या कार्यक्रमाप्रसंगी अशोक कोळी, सुनील कुयटे, रवींद्र कदम, राजेंद्र परदेशी,बापू मोरे, सुनील गायकवाड उपस्थित होते.

Web Title: Khadakmalegaon school 'Ek Dhaga Shaurya Ka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.