वडाळा-गोपालवाडी रस्त्यावर खड्डेच-खड्डे; मनपाचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 05:01 PM2019-08-18T17:01:11+5:302019-08-18T17:03:58+5:30

नाशिक : वडाळागावातील सिध्द हनुमान मंदिरापासून गोपालवाडीमार्गे श्री.श्री.रविशंकर दिव्य या १००फूटी रस्त्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असलेला गोपालवाडी रस्त्याची प्रचंड ...

Khadech-Khadde on Wadala-Gopalwadi road; Corpse of the corpse | वडाळा-गोपालवाडी रस्त्यावर खड्डेच-खड्डे; मनपाचा कानाडोळा

वडाळा-गोपालवाडी रस्त्यावर खड्डेच-खड्डे; मनपाचा कानाडोळा

Next
ठळक मुद्देमुख्य रस्त्यावरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेवडाळागावाचा मुख्य रहदारीच्या रस्त्याचे तीनतेरा झाले भूयारी गटारीच्या कामांमुळे रस्त्यांची प्रचंड दुर्दशा

नाशिक : वडाळागावातील सिध्द हनुमान मंदिरापासून गोपालवाडीमार्गे श्री.श्री.रविशंकर दिव्य या १००फूटी रस्त्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असलेला गोपालवाडी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर या भागात गटारीचे काम करण्यात आले. त्यानंतर थातुरमातुर पध्दतीने मुरूम टाकण्यात येऊन रस्ता दुरूस्ती के ली गेली; मात्र पावसाळ्यात खडीकरण वाहून गेले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भूमिगत गटारीच्या कामासाठी हा रस्ता तीन महिन्यांपुर्वी मनपाच्या भूयारी गटार विभागाकडून खोदला गेला. त्यानंतर गटारीचे काम आटोपल्यानंतर उखडलेल्या रस्त्याचे खडीकरण कसे तरी संबंधित विभागाकडून केले गेले; मात्र मागील पंधरवड्यापुर्वी झालेल्या जोरदार संततधारेत खडीकरण वाहून गेले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. तसेच सर्वत्र गाळ साचला आहे. यामुळे रस्त्यावरून पायी जाणेदेखील शक्य होत नसल्याने या भागातील नागरिकांना रस्ता बदलावा लागत आहे. वाहने येथून मार्गस्थ होताच नादुरूस्त होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मनपा प्रशासनाकडून या रस्त्याच्या दुरूस्तीकडे कानाडोळा केला जात आहे. पावसाने उघडीप देऊनदेखील अद्याप वडाळागावातील रस्त्यांची दुरूस्तीकडे लक्ष पुरविले जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
वडाळागावात पावसाळापुर्व भूयारी गटारीच्या कामांमुळे रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. तसेच रस्ता एका बाजूने पुर्णपणे उखडला आहे. त्यामुळे त्याचा वापर नागरिकांना करता येणे अशक्य होत आहे. वडाळा चौफूलीपासून थेट पांढरी आई देवी मंदिरापर्यंत वडाळागावाचा मुख्य रहदारीच्या रस्त्याचे तीनतेरा झाले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांचीही दुरूस्ती करणे गरजेचे आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे मनपा प्रशासनाने माती-मुरूम टाकून खड्डे बुजविण्यापेक्षा थेट डांबरीकरण करण्यावर भर द्यावा, अशी मागणी होत आहे. कारण श्रावणसरींचा वर्षाव अद्यापही सुरू असून पावसाने माती, मुरूम वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरण्यास मदत होईल, असे नागरिकांनी सांगितले.

Web Title: Khadech-Khadde on Wadala-Gopalwadi road; Corpse of the corpse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.