खैराई-वाघेरा किल्ला पर्यटन विकासापासून वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 06:18 PM2020-07-27T18:18:17+5:302020-07-27T18:23:30+5:30
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा व खैराई किल्ला हे अत्यंत महत्वाचे गडकोट मानले जातात. मात्र त्याकडे लक्ष दिलेजातनल्याने हे किल्ले विकासापासून वंचित राहिले आहेत. लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष देवून चांगले पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करण्याची मागणी होतआहे.
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा व खैराई किल्ला हे अत्यंत महत्वाचे गडकोट मानले जातात. मात्र त्याकडे लक्ष दिलेजातनल्याने हे किल्ले विकासापासून वंचित राहिले आहेत. लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष देवून चांगले पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करण्याची मागणी होतआहे.
वाघेरा किल्ला हा त्र्यंबकेश्वरच्या अगदी जवळ १६ किलो मिटर अंतरावर आहे तर खैराई किल्ला हा त्र्यंबकेश्वर पासून ४५ किलो मिटर अंतरावर आहे. हिरवीगर्द झाडी, व आजूबाजूला घनदाट झाडी वेली फुलांनी घाट माथाच्या नाल्यामधून खळखळणारे झरे, आल्हाददायक वातावरण व किल्याच्या पायथ्याशी असलेली कारवी कुडानी सजलेली ही खेडी पर्यटकाना भूरळ घालतात. किल्यावर्ती अनेक ठिकाणी पाणवठे असून आज त्यांची अतिशय दयनीय परिस्तिथी आहे. या ठिकाणी जुन्या तोफा दोन असून त्यातील एक तोफ तुटलेल्या अवस्थेत आहेत. या ठिकाणी पर्यटक यांची गर्दी होत असते. येथील धबधबे आण िखोल खोल ढोह हे एक आकर्षणाचा भाग आहे.
मागील वर्षी हरसूल व ठाण पाडा येथील तरु णांनी किल्ल्यावर्ती वृक्षारोपण व पाणवठे यांची साप सपाई केली होती. आज या किल्ल्याची ढासळला ढसाळ होत असून या इतिहास कालीन किल्याचे संवर्धन जपावे यासाठी येथील परिसरातील युवकांनी तसेच ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन, आमदार हिरामण खोसकर यांना निवेदन देऊन पर्यटन विकास निधी उपल्बध करून द्यावा अशी मागणी केली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा तसेच खैराई हे दोन्ही किल्ले तालुक्याच्या शान वाढवत आहे. खैराई किल्ला महाराष्ट्र व गुजरात सीमे लगत असून येथील सृष्टी सौंदर्य व किर्र झाडी यामुळे पर्यटक आकर्षित होत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडकोटावर माणसासारखे प्रेम केले, त्याच्या स्मृती जपण्याची ही वेळ आहे, यामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, त्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी पर्यटन विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
- मिथुन राऊत, शिवप्रेमी व गडकोट प्रेमी.