मूळगावी परतण्यासाठी ‘खाकी’ने दाखविला मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:15 AM2021-03-23T04:15:39+5:302021-03-23T04:15:39+5:30
पोलिसांच्या संवेदनशील मनाचे घडले दर्शन मुंबईस्थित एका तरुणाने त्याच्या ज्येष्ठ शिक्षिकेचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा ४ मे रोजी ट्विट ...
पोलिसांच्या संवेदनशील मनाचे घडले दर्शन
मुंबईस्थित एका तरुणाने त्याच्या ज्येष्ठ शिक्षिकेचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा ४ मे रोजी ट्विट करून नाशिक पोलिसांकडे व्यक्त केली होती. या टि्वटची दखल घेत उपनगर येथे राहणाऱ्या प्रा.डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांची भेट घेत पोलिसांनी निर्भया पथकाच्या उपस्थित केक कापून वाढदिवस साजरा केला होता. यावेळी उपस्थित पोलिसांनी त्यांना गुलाबपुष्प देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अशाच पद्धतीने एप्रिल महिन्यात अशोकामार्गावरील गणेशबाबानगर येथे एका फ्लॅटमध्ये पार पडलेल्या घरगुती विवाहसोहळ्याला वऱ्हाडी म्हणून पोलिसांच्या पथकाने हजेरी लावली होती. यावेळी या अपार्टमेंटच्या खाली पोलिसांनी वाहने उभी करत विवाहावर अधारित हिंदी चित्रपटातील गीत ध्वनिक्षेपकाद्वारे वाजवून नववधू हरिणी जोशी व वर निकुंज यांना शुभेच्छा दिल्या होत्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाला होता. अशाप्रकारे पोलिसांनी संवेदनशीलतेचे दर्शन लॉकडाऊन काळात घडविले होते.
---