‘खाकी’ची रोगप्रतिकारक शक्ती वाढली; दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 AM2021-05-25T04:14:56+5:302021-05-25T04:14:56+5:30

गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मोठ्या संख्येने नागरिक कोरोनाबाधित होऊ लागले आणि औषधांसह रुग्णालयांमध्ये खाटांचाही तुटवडा निर्माण झाला. अशा भयावह ...

‘Khaki’s’ immune system increased; Overcome Corona in the second wave! | ‘खाकी’ची रोगप्रतिकारक शक्ती वाढली; दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात !

‘खाकी’ची रोगप्रतिकारक शक्ती वाढली; दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात !

Next

गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मोठ्या संख्येने नागरिक कोरोनाबाधित होऊ लागले आणि औषधांसह रुग्णालयांमध्ये खाटांचाही तुटवडा निर्माण झाला. अशा भयावह परिस्थितीत रस्त्यावर उतरून नागरिकांमध्ये राहून बंदोबस्तावर तैनात राहणाऱ्या पोलिसांना कोरोनाने मात्र फारसे प्रभावित केले नाही. त्याचे मुख्य कारण यावर्षी पोलिसांचे झालेले लसीकरण आणि पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याकडून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याबाबत सांगितल्या जाणाऱ्या उपाययोजना असल्याचे बोलले जात आहे.

---इन्फो---

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोज सूर्यस्नान अन‌् सात्त्विक आहार

पोलिसांकडून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रामुख्याने अवलंबलेले सूर्यस्नान, जलनेती, योगा-प्राणायाम प्रशिक्षण कार्यक्रम, आवळायुक्त ग्रीन ज्युसचे नियमित सेवन, पूरक ठरत आहे. पोलीस आयुक्तालयाकडून सात्त्विक आहाराविषयी वेळोवेळी होणाऱ्या मार्गदर्शनामुळे शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांची आहारशैलीसोबतच जीवनशैलीही सुधारत आहे.

---

इन्फो--

आयुक्तालयाचा कोरोनाविरुध्दचा लढा असा...

पोलीस कोविड केअर सेंटरची उभारणी, कोविड उपचार केंद्राची उभारणी, आवळायुक्त ग्रीन ज्युस, सूर्यस्नान प्रशिक्षण कार्यशाळा, जलनेती, योगासनांचे धडे व सरावावर भर, यासोबत रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी पूरक खाद्यपदार्थ, सलाड, कडधान्ये, फळांचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न, अशा अनेकविध आरोग्यविषयक खबरदारी व उपाययोजनांमुळे कोरोनाचा विळखा आयुक्तालयाभोवती अधिकाधिक घट्ट होऊ शकलेला नाही.

---

-कोट---

पोलीस जर सुदृढ असला तर तो सक्षमपणे पोलिसिंग करू शकतो. आयुक्तालयाकडून कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यावर्षी जरी शहरात कोरोनाची दुसरी लाट अधिक प्रभावी असली तरी, पोलीस कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत निम्मे असलेले दिसून येते. पोलिसांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करण्याबरोबरच त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले जात आहे.

- दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त

--आलेख---

पहिली लाट

एकूण रुग्ण : ७२,३५३

पोलीस : ४४१

पोलीस मृत्यू : ०७

--

दुसरी लाट

--

एकूण रुग्ण : १,४४,४४५०

पोलीस- २२६

पोलीस मृत्यू- ०५

---

डमी फॉरमेट आर वर २४स्टार ७३४

फोटो आर वर : २४पोलीस सनबाथ नावाने :

पोलीस कोविड केअर सेंटरच्या आवारात सकाळच्या कोवळ्या उन्हात सूर्यस्नान घेताना पोलीस कर्मचारी.

===Photopath===

240521\24nsk_1_24052021_13.jpg~240521\24nsk_2_24052021_13.jpg

===Caption===

सुर्यस्नान घेताना पोलीस~डमी फॉरमेट

Web Title: ‘Khaki’s’ immune system increased; Overcome Corona in the second wave!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.