‘खाकी’च्या रोगप्रतिकारकशक्तीला मिळतोय ‘बुस्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:16 AM2021-05-18T04:16:05+5:302021-05-18T04:16:05+5:30
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मोठ्या संख्येने नागरिक कोरोनाबाधित होऊ लागले आणि औषधांसह रुग्णालयांमध्ये खाटांचाही तुटवडा निर्माण झाला. अशा भयावह ...
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मोठ्या संख्येने नागरिक कोरोनाबाधित होऊ लागले आणि औषधांसह रुग्णालयांमध्ये खाटांचाही तुटवडा निर्माण झाला. अशा भयावह परिस्थितीत रस्त्यावर उतरून नागरिकांमध्ये राहून बंदोबस्तावर तैनात राहणाऱ्या पोलिसांना कोरोनाने मात्र फारसे प्रभावित केले नाही. त्याचे मुख्य कारण यावर्षी पोलिसांचे झालेले लसीकरण आणि पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याकडून रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याबाबत सांगितल्या जाणाऱ्या उपाययोजना असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने सूर्यस्नान, जलनेती, योगा-प्राणायाम प्रशिक्षण कार्यक्रम, आवळायुक्त ग्रीन ज्युसचे नियमित सेवन, रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास पूरक ठरणाऱ्या आहाराविषयी वेळोवेळी मार्गदर्शन यामुळे शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांची आहारशैलीसोबतच जीवनशैलीदेखील बदलत असल्याचे दिसत आहे. बहुतांश पोलीस सकाळी कोवळ्या उन्हात सूर्यस्नान घेण्यास प्राधान्य देतात. यामुळे ‘ड’ जीवनसत्त्वाचा शरीरात अभाव जाणवत नाही, ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. योगा-प्राणायामामुळे मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या आजारावरही नियंत्रण ठेवणे पोलिसांना सोपे होत आहे. यासोबतच पोलिसांचे मानसिक आरोग्यही सुधारत असून ताणतणावाचा भार हलका वाटत असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.
----इन्फो---
आयुक्तालयाचा कोरोनाविरुध्दचा लढा असा...
पोलीस कोविड केअर सेंटरची उभारणी, कोविड उपचार केंद्राची उभारणी, आवळायुक्त ग्रीन ज्युस, सूर्यस्नान प्रशिक्षण कार्यशाळा, जलनेती, योगासनांचे धडे व सरावावर भर यासोबत रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यासाठी पूरक खाद्यपदार्थ, सलाड, कडधान्ये, फळांचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न अशा अनेकविध आरोग्यविषयक खबरदारी व उपाययोजनांमुळे कोरोनाचा विळखा आयुक्तालयाभोवती अधिकाधिक घट्ट होऊ शकलेला नाही.
---आलेख--
कोरोनाची पहिली लाट (२०२०)
कोरोनाबाधित पोलीस अधिकारी- ४४
कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी- ३९७
एकूण कोरोनाबाधित पोलीस- ४४१
मृत्यू- ७
---
कोरोनाची दुसरी लाट (२०२१)
कोरोनाबाधित पोलीस अधिकारी-२८
कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी-२३८
एकूण कोरोनाबाधित पोलीस - २६६
मृत्यू-५
--पॉइंटर्स---
शहरात ७ हजार ९२९ ॲक्टिव रुग्ण
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - २,१६८५८
एकूण मृत्यू - १७४६
---कोट---
पोलीस जर सुदृढ असला तर तो सक्षमपणे पोलिसिंग करू शकतो. त्यामुळे पोलिसाला शारीरिक-मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यावर भर देत आहोत. आयुक्तालयाकडून कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यावर्षी जरी शहरात कोरोनाची दुसरी लाट अधिक प्रभावी असली तरी पोलीस कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत निम्मे झालेले दिसून येते. पोलिसांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले जात आहे.
- दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त
---
फोटो आर वर १७पोलीस/१/२
--
कोविड सेंटरच्या आवारात सूर्यस्नान घेताना पोलीस रुग्ण.
ग्रीन ज्युसचे सेवन करताना पोलीस अधिकारी.
---
डमीच्या फॉरमेटनुसार भरावी.
===Photopath===
170521\17nsk_40_17052021_13.jpg~170521\17nsk_41_17052021_13.jpg
===Caption===
कोविड सेंटरच्या आवारात सुर्यस्नान घेताना पोलीस रुग्ण. ग्रीन ज्युसचे सेवन करताना पोलीस अधिकारी.~कोविड सेंटरच्या आवारात सुर्यस्नान घेताना पोलीस रुग्ण. ग्रीन ज्युसचे सेवन करताना पोलीस अधिकारी.