शिवसेना सदस्यांच्या स्नेहभोजनाची ‘खमंग’ चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 11:44 PM2017-08-01T23:44:41+5:302017-08-02T00:08:49+5:30

शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने रोख स्वरूपात शेतकºयांना मदत देणार असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या नगरसेवकांनी त्यांचे मानधन जमा केल्यानंतर आता जिल्हा परिषद सदस्यांमध्ये त्यांचे मानधन पक्षप्रमुखांकडे जमा करण्याची तयारी सुरू आहे.

'Khamang' discussion of Shiv Sena members' funeral | शिवसेना सदस्यांच्या स्नेहभोजनाची ‘खमंग’ चर्चा

शिवसेना सदस्यांच्या स्नेहभोजनाची ‘खमंग’ चर्चा

Next

नाशिक : शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने रोख स्वरूपात शेतकºयांना मदत देणार असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या नगरसेवकांनी त्यांचे मानधन जमा केल्यानंतर आता जिल्हा परिषद सदस्यांमध्ये त्यांचे मानधन पक्षप्रमुखांकडे जमा करण्याची तयारी सुरू आहे. या मानधन जमा करण्याच्या तयारीचा एक भाग म्हणून मंगळवारी (दि.१) जिल्हा परिषदेच्या एका पदाधिकाºयाच्या निवासस्थांनी वांग्याचे भरीत आणि चमचमीत शिरा असलेल्या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आल्याचे समजते. या स्नेहभोजनाची विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये ‘खमंग’ चर्चा जिल्हा परिषदेत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, दर दोन-तीन महिन्यांत शिवसेना सदस्यांच्या भावना समजून घेण्यासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठीच शिवसेना सदस्य एकत्र आल्याचा दावा संबंधित पदाधिकाºयाने केला आहे.मागील महिन्यात भाजपासह शिवसेना, राष्टÑवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसच्या सदस्यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करण्यासाठी एका महिन्याचे मानधन देण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला होता. प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाने सदस्यांचे संमतीपत्र असल्याशिवाय त्यांचे एक महिन्याचे मानधन थेट राज्य सरकारला पाठविण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता पक्षीय पातळीवर हे मानधन गोळा करण्यास सुरुवात झाली असून, शिवसेनेने त्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. हा निधी थेट जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याऐवजी आता शिवसेनेने तो त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी तयारी सुरू केली
आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे निवडून आलेले २६ सदस्य प्रत्येकी तीन हजार रुपये मानधन गोळा करणार असून, त्यात शिवसेना पदाधिकारी, अधिकारी व गटनेते अधिकची रक्कम टाकून एक लाख अकरा हजार रुपयांचे मानधन शिवसेनेकडे शेतकरी मदतनिधी म्हणून जमा करणार असल्याचे समजते.
महिलेचे दागिने लंपास

Web Title: 'Khamang' discussion of Shiv Sena members' funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.