खंबाळे येथील तरु णाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:58 PM2019-05-29T23:58:26+5:302019-05-30T00:23:08+5:30
तालुक्यातील खंबाळे येथील तरु णासोबत असणारे प्रेमसंबंध अमान्य करत तरु णीच्या नातेवाइकांनी सदर तरु णाला बेदम मारहाण करून त्याच्या दुचाकीची तोडफोड केल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावरील गोंदे फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सोमवारी दि.२७ दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
सिन्नर : तालुक्यातील खंबाळे येथील तरु णासोबत असणारे प्रेमसंबंध अमान्य करत तरु णीच्या नातेवाइकांनी सदर तरु णाला बेदम मारहाण करून त्याच्या दुचाकीची तोडफोड केल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावरील गोंदे फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सोमवारी दि.२७ दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सदर तरु णाच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात गोंदे व दोडी येथील ७ जणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राहुल साहेबराव भालेराव (२४), रा. खंबाळे या तरु णाचे गोंदे येथील तरु णीशी प्रेमसंबंध असून, ते दोघे कोर्टात जाऊन लग्न करणार होते. मात्र राहुल हा अन्य समाजातील असल्याने सदर तरु णीच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. सोमवारी दुपारी राहुल दुचाकीवरून (क्र.एमएच ०४ जेए ०२२६) सिन्नरकडे जात असताना गोंदे फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सचिन सुरेश आव्हाड, सुरेश विठ्ठल आव्हाड, रामदास आव्हाड, मंगेश, गौरव व सोमनाथ, (सर्व रा. गोंदे ) व दोडी येथील पोलीसपाटील सुदाम पाटील यांच्यासह इतर अनोळखी ७ ते ८ जणांनी त्यांची गाडी आडवी लावून राहुलची दुचाकी थांबवली. त्याला जवळच असलेल्या नटराज सांस्कृतिक कला केंद्राच्या पाठीमागे ओढत नेऊन सर्वांनी मारहाण करायला सुरु वात केली. त्याच्या दुचाकीचे नुकसान केले. मोबाइल हिसकावून घेत सिमकार्ड तोडून टाकले. नातेवाइकान्ांंी त्याला उपचारासाठी तातडीने नाशिकच्या जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला असून ,वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधव पिडले याप्रकरणी तपास करीत आहेत.
जखमी अवस्थेत तरुणाला घेतले ताब्यात
सदर मुलीच्या घरासमोर नेऊन राहुलला पुन्हा मारहाण करण्यात आली. जातीवाचक शिवीगाळ करून आमच्या मुलीसोबत लग्न करायची तुझी लायकी नाही असे सांगत धमकावले. राहुलला पोलिसांकडे न नेता रस्त्यात एखाद्या वाहनाखाली टाकून द्या असेही मारहाण करणारे म्हणत होते. याबाबत नातेवाइकांना समजल्यावर गोंदे फाटा परिसरातून जखमी अवस्थेत राहुलला ताब्यात घेण्यात आले.