खामखेडा गाव आठ दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 09:44 PM2020-07-27T21:44:38+5:302020-07-28T00:29:51+5:30
खामखेडा : गावात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर ग्रामपंचायतीने वैद्यकीय व मेडिकल सेवा वगळता संपूर्ण गाव पुढील आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी भरणारा आठवडे बाजारही पुढील आदेश येईपर्यंत बंद असल्याची माहिती उपसरपंच संजय मोरे यांनी दिली.

खामखेडा येथे २९ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आल्याने खबरदारीचा तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामपंचायतीने ग्रामस्थांशी चर्चा करून दि. २ आॅगस्टपर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय व मेडिकल सेवा वगळता गावातील किराणा, भाजीपाला दुकाने तसेच सर्व प्रकारचे व्यवहार व व्यवसाय बंद असणार आहेत. मास्क न वापरता विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात येणार आहे. भाजीपाला चौकात किंवा बस स्टँडवर विक्री करताना आढळल्यास माल जप्त करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही ग्रामपंचायतीने जाहीर केले आहे.