विंचूरच्या ग्रामसभेत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:46 AM2018-08-17T00:46:04+5:302018-08-17T00:46:11+5:30

विंचूर : येथील शनि महाराज पंच कमिटीत सर्व समाजाचे पंच असावे या मुद्द्यावरून तेली समाज आणि इतर समाजातील नागरिकांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे तसेच पाणीपट्टी वाढ, गावातील अतिक्रमण या प्रश्नांमुळे येथील ग्रामसभा चांगलीच गाजली. मात्र ग्रामविकास अधिकारी खैरनार यांनी सदर प्रकरण न्यायालयीन कक्षेत असल्याचे स्पष्ट करीत मध्यस्थी केली व वादावर पडदा पाडला.

Khandajangi in Vishnur Gram Sabha | विंचूरच्या ग्रामसभेत खडाजंगी

विंचूरच्या ग्रामसभेत खडाजंगी

Next
ठळक मुद्दे सभेचे अध्यक्ष बंडू नेवगे यांनी ग्रामसभा तहकूब केली़

विंचूर : येथील शनि महाराज पंच कमिटीत सर्व समाजाचे पंच असावे या मुद्द्यावरून तेली समाज आणि इतर समाजातील नागरिकांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे तसेच पाणीपट्टी वाढ, गावातील अतिक्रमण या प्रश्नांमुळे येथील ग्रामसभा चांगलीच गाजली. मात्र ग्रामविकास अधिकारी खैरनार यांनी सदर प्रकरण न्यायालयीन कक्षेत असल्याचे स्पष्ट करीत मध्यस्थी केली व वादावर पडदा पाडला. अध्यक्षस्थानी बंडुशेठ नेवगे होते.
सद्यस्थितीत शनि महाराज मंदिर पंच कमिटीवर तेली समाजाचे नागरिक आहेत. मात्र शनि महाराज मंदिर गावातील असल्याने त्यावर फक्त तेली पंच मंडळ न राहता पंच कमिटीवर इतर समाजाचे नागरिक असावेत म्हणून काही जणांनी यापूर्वी याविरोधात याबाबत आवाज उठविला होता.
परिणामी सदर प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले. सदर देवस्थान पंच कमिटीवर सर्व समाजाचे लोक असावेत अशी मागणी ग्रामसभेत राजाराम दरेकर, मधुकर दरेकर, दत्तू बोडखे, मच्छिंद्र संधान, राजेंद्र म्हसकर आदींनी केली.
यावर शनिमंदिराची देखभाल पूर्वीपासून तेली समाज करीत असल्याने त्या पंच कमिटीवर आमचेच नाव असावे, अशी मागणी गंगाधर गोरे, विलास गोरे, सोमनाथ शिरसाठ, बाळासाहेब नेवगे आदींसह तेली समाजाने केली. यावरून चांगलीच खडाजंगी झाली. ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. विंचूरला सोळा गाव पाणी-पुरवठ्यासाठी २५ लाखांच्यावर पाणीपट्टी भरावी लागत आहे. वसुली केवळ १८ लाख होत असल्याने सुमारे आठ लाख रुपयांची तफावत असल्या- कारणाने पाणीपट्टीत ५० रुपयांनी वाढ करण्यÞाबाबतची सूचना ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मांडली. मात्र याबाबत ठराव होऊ शकला नाही. यानंतर सभेचे अध्यक्ष बंडू नेवगे यांनी ग्रामसभा तहकूब केली़

Web Title: Khandajangi in Vishnur Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.