आयटीआयमध्ये खंडेनवमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:31 IST2020-10-24T22:49:11+5:302020-10-25T01:31:44+5:30
जानोरी : मविप्र संचलित मोहाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शनिवारी (ता.२४) खंडेनवमीनिमित्ताने केंद्रातील विविध विभागांतील यंत्राचे व साहित्यांचे पूजन स्थानिक आयटीआय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

मोहाडी आयटीआयमध्ये खंडेनवमीनिमित्त विविध साहित्यांचे पूजन करताना मान्यवर आदी.
जानोरी : मविप्र संचलित मोहाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शनिवारी (ता.२४) खंडेनवमीनिमित्ताने केंद्रातील विविध विभागांतील यंत्राचे व साहित्यांचे पूजन स्थानिक आयटीआय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी विश्वकर्मा व देवीच्या प्रतिमेचे पूजन कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी, तुकाराम जोंधळे यांनी केले. याप्रसंगी अशोक जाधव, लक्ष्मण देशमुख, वसंत देशमुख, सतीश जाधव, नंदकुमार डिंगोरे, रवींद्र पालखेडे, सुजित कळमकर, सहनिदेशक जितेंद्र जाधव, भाऊसाहेब जाधव, योगेश जाधव, कैलास बोरस्ते, अनिल डोगमाणे, सचिन साखरे, राजेंद्र देशमुख आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य हेमंत उगले यांनी प्रास्ताविक केले. चौधरी यांनी आभार मानले.