खांदेपालटावरून सदस्यही झाले आक्रमक प्रशासनाची डोकेदुखी वाढणार
By admin | Published: February 7, 2015 01:39 AM2015-02-07T01:39:03+5:302015-02-07T01:42:48+5:30
खांदेपालटावरून सदस्यही झाले आक्रमक प्रशासनाची डोकेदुखी वाढणार
नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्वच कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांच्या खांदेपालटावरून जिल्हा परिषदेत प्रशासनविरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष उभा ठाकण्याची भीती असून, त्याअनुषंगाने काही सत्ताधारी सदस्यांनीच या अधिकाऱ्यांचे खांदेपालट न झाल्यास येत्या स्थायी समितीसह सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेण्याची तयारी केली आहे. प्रशासनाची त्यामुळे डोकेदुखी वाढणार असून, सामान्य प्रशासन विभागाने तयार करून दिलेल्या माहितीच्या आधारे बदल्या करायच्या की सरसकट कर्मचाऱ्यांचे खांदेपालट करायचे? याबाबत प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे. मुळातच गोपनीय पत्र देऊनही बांधकाम व अर्थ समिती सभापती तथा उपाध्यक्ष प्रकाश वडजे व कृषी तसेच पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांची कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षक बदलण्याची मागणी सार्वजनिक झाल्यानंतर केदा अहेर व प्रकाश वडजे यांनी मग प्रशासनाकडे सरसकट सर्वच विभांगातील कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांच्या बदल्यांची मागणी लावून धरली होती. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकरही या खांदेपालटासाठी अनुकूल असताना या बदल्यांच्या फायलीचा प्रवास मात्र संपता संपत नसल्याचे चित्र आहे. या ना त्या कारणाने याअंतर्गत बदल्यांचा चेंडू सामान्य प्रशासन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यादरम्यानच फिरत असल्याची चर्चा आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून काही सत्ताधारी सदस्यांनी आता या प्रकरणात उडी घेतली